देहू आळंदी पासून येणाऱ्या भावीक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य विभाग वारकऱ्यांच्या साठी औषध उपचार त्याचप्रमाणे त्यांना चालत येताना होणारे आजार या सर्व आजारांवर औषध उपचार व ॲम्बुलन्स तसेच बेडची व्यवस्था ही केली जाते. वारकरी भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग हे आरोग्य यंत्रणा राबवित आहेत.
वारकरी भक्त देहू आळंदी पासून ते पंढरपूर तीर्थक्षेत्री येई तोपर्यंत आणि पंढरपूर या ठिकाणी मुक्कामी असल्याचा दिवसापासून पंढरपूर परिसरामध्ये असलेली वाखरी गोपाळपूर त्याचप्रमाणे 65 एकर परिसर आणि तीन रस्ता या चार ठिकाणी भाविक भक्तांच्या वर औषध उपचार हे केले गेले. एकूण 13 लाख 96 हजार 72 एवढ्या मोठ्या संख्येने वारकरी भाविक भक्तांनी औषध उपचाराचा लाभ घेतला.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व असंख्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही आरोग्य वारी यशस्वी केली गेली. वारकरी भाविक भक्तांच्या मधून या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या योजनेवर समाधान व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने वारकरी भक्तांची आरोग्याची जपणूक करण्यासाठी ही शासनाने सुरू केलेली आरोग्य विषयक योजना खूपच चांगली आहे. असे असंख्य वारकरी भक्तांच्या मनोगतातून व्यक्त होत आहे.