पंढरपूर (प्रतिनिधी) - आषाढी एकादशी निमित्त वारकरी भाविकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने सरगम चौक येथे आषाढी एकादशीला आलेल्या भाविक भक्तांना मोफत खिचडीचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी आषाढी एकादशीचे औचित्य साधून भाविक भक्तांना मोफत खिचडीचे वाटप करण्यात येते. याही वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान काळे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे, शहर अध्यक्ष दिगंबर सुडके, तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक, राष्ट्रवादी युवकचे नेते, संकेत ढवळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य नारायण शिंदे, अर्जुन जाधव, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, संचालक मोहन नागटिळक, सुनिल पाटील, अरुण नलवडे, भाळवणीचे सरपंच रणजित जाधव, यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव काळे, माजी नगरसेवक शकुर बागवान, युवा गर्जना समाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष विश्वास सुरवसे, अक्षय पवार, पक्षाचे पदाधिकारी, योगेश जाधव, सचिन पवार, विश्वास उपासे, रामचंद्र मोरे, डॉ.अजित काळे, अमोल पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.