मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 आणि 5 ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर..

0
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा

           सोलापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.
        महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे हे दिनांक 4 ऑगस्ट रविवार रोजी सोलापूर येथे येणार असून सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम आहे.
          सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी तुळजापूर मार्गे धाराशिव येथे जाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)