चेअरमन श्री. अभिजीत पाटील साहेब यांचे वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल कारखान्यावर विविध कार्यक्रम

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - वेणुनगर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर येथे कारखान्याचे चेअरमन मा.श्री अभिजीत आबा पाटील यांच्या ४१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दि. ५ जून जागतिक पर्यावरण दिन ते स्वातंत्र दिन १५ ऑगस्टपर्यंत कारखाना परिसरामध्ये १०००० वृक्ष लागवडीचा संकल्प मा. संचालक मंडळाने घेतलेला असून आज अखेर कारखाना साईटवर व श्री विठ्ठल प्रशाला परिसरात ५००० वृक्षांची लागवड केलेली आहे. यासाठी वन विभाग पंढरपूर यांचे सहकार्य लाभत आहे. उर्वरीत वृक्ष लागवड १५ ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार आहे. अशी माहिती सत्कार कमिटीचे अध्यक्ष श्री ओ.जे. अवद्युत यांनी दिली.
       कारखान्याचे चेअरमन मा.श्री अभिजीत आबा पाटील यांचे १ ऑगस्ट २०२४ रोजी ४१ वा वाढदिवस संपन्न होत आहे. सदर वाढदिवसानिमित्त कारखाना साईटवर गुरुवार दि. ०१.०८.२०२४ सकाळी ९.०० वाजता मा. डॉ. सौ. निशिगंधा माळी, माजी जि. प. अध्यक्षा, सोलापूर यांचे शुभहस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले आहे. दि. १.०८.२०२४ वेळ दुपारी १.३० वाजता चेअरमन अभिजीतआबा पाटील यांचा सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तसेच शुक्रवार दि. ०२.०८.२०२४ सकाळी १०.०० वाजता मा. सौ. चैताली मनिष झरांडे, वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनिकरण, पंढरपूर विभाग पंढरपूर, श्रीमती ज्योतीताई कुलकर्णी, समाजसेविका, उपळाई, ता. माढा यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दि.०३.०८.२०२४ रोजी श्री विठ्ठल प्राथमिक शाळा, वेणुनगर येथील इ. १ ली ते ४ थी पर्यंतचे विदयार्थ्यांसाठी खाऊ वाटप, गणवेश वाटप, शालेय साहित्य वाटप आयोजन केलेले आहे. सोमवार दि. ०५.०८.२०२४ सकाळी ११.३० वाजता श्री नागन्नाथ विद्यालय मुकबधीर शाळा, बाभुळगांव येथे वृक्षारोपण व स्नेह भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

           सदर कार्यक्रम कारखान्याचे व्हा. चेअरमन सौ. प्रेमलताताई रोंगे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार व श्री विठ्ठल प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वतीने, मा. अभिजीतआबा पाटील सत्कार समिती वेणुनगर यांचे वतीन आयोजन करण्यात आलेले आहे.

         तरी कारखान्याचे सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, ठेकेदार, व्यापारी व हितचिंतक यांनी सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सत्कार कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)