करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमला कै. राजूबापू पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मानपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित
पंढरपूर (प्रतिनिधी) - करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने गेली तीन वर्षापासून करकंब नगरीत भारतीय जातीच्या झाडांची वृक्षारोपणाची मोहीम सुरू केली असून तीन वर्षांपासून लावलेल्या झाडांनी सुंदर रुप धारण केले आहे. ती १०-१५ फुटांपर्यंत वाढली असून भविष्यकाळात हिच झाड ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण उपयोगी पडणार असून भविष्यकाळात ही अनेक झाड लावण्यासाठी प्रयत्नशील असून आत्तापर्यंत ६०० - ७०० झाडांचे वृक्षारोपण यशस्वी झालं आहे. यासाठी करकंब गावच्या लेकी, पुणे स्थित करकंबकर, सकाळ तनिष्का, करकंब पोलीस स्टेशन यांनी अतिशय मोलाचे अर्थिक सहकार्य केल्याने हे शक्य झाले असून चालू वर्षात संतांच्या नावाने १०० झाड लावली असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. झाड लावणं सोपं असलं तरी ती झाड जोपासना करणे कठीण आणि महत्त्वाचे आहे आणि ती झाड या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने जोपासली जात आहेत. तसेच जागर स्वच्छता अभियान टीमच्या वतीने प्रत्येक रविवारी दोन तास स्वच्छतेसाठीही देत असताना करकंब गाव स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. याचीच दखल घेत भोसे येथील कै. राजूबापू पाटील यांच्या स्मृति प्रित्यर्थ प्रथमच राजुबापू पाटील फाऊंडेशन भोसे यांचे वतीने करकंब गावच्या लेकीचं झाड या संस्थेला एक आदर्श संस्था म्हणून तसेच सुधाकर कवडे साहित्यिक, वासुदेव गायकवाड कृषी, श्रीकृष्ण वाघमोडे (शैक्षणिक) तर धनाजी खोत यांना प्रशासकीय सेवा पुरस्कार, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या शुभहस्ते आणि शिवतेज मोहिते पाटील, धनाजी साठे, कल्याणराव काळे, भगिरथ भालके, युवराज पाटील, गणेशदादा पाटील, तात्यासाहेब पाटील, शेखरभैय्या पाटील, मारुती जाधव, अतुल खरात, दिनकर कदम, बालाजी कोरके, आबा कोरके यांच्या उपस्थितीत आदर्श पर्यावरण संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी सुरुवातीला वै. राजुबापु पाटील यांच्या प्रतिचे पुजन मान्यवरांच्या उपस्थितीत केले. प्रास्ताविक शेखर कोरके यांनी केले. यावेळी बबनदादा शिंदे यांचे बरोबर गणेशदादा पाटील तसेच यासर्व मान्यवरांनी सर्व पुरस्कारार्थी यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर राजुबापूंच्या कार्याची आठवण करत राजुबापूंच्या जाण्याने राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पुरस्काराने राजुबापूंच्या कार्याच्या आवडीच्या क्षेत्रामधील व्यक्तिंना पुरस्कार देऊन त्यांचा स्मृती जतन करण्याचे काम या फाऊंडेशनच्या वतीने होत आहे.
यावेळी ज्ञानेश्वर दुधाणे यांनी मनोगतात सांगितले की, सामाजिक काम करीत असताना एकाच काम नसुन अनेक तरुणांची एकी महत्वाची आहे. या पुरस्काराने आणखी मोठी जबाबदारी वाढली असून आणखी जोमाने काम करण्याची उर्जा निर्माण झाली असून, प्रत्येक व्यक्तीने झाड लावण्याचे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केलं. एका चांगलं काम करत असलेल्या संस्थेला पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सर्व करकंबकर ग्रामस्थांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.या संस्थेचे कामकाज आणि झाड जोपासण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे, हरिश्चंद्र वास्ते, गणेश पिसे, देविदास काटवटे, नंदलाल कपडेकर, विशाल बोधे, बापू खारे, नागेश खारे, चेतन पुरवत, शिवम रणे, अक्षय नगरकर, प्रमोद रेडे, धोंडीराम भाजीभाकरे, पांडूरंग काटवटे, आत्माराम चवरे, रमेश खारे तसेच जागर स्वच्छता अभियान टीमच्या अंजली टकले, वृषाली बोधे, पूजा रणदिवे, देवकी दुधाणे, सिध्दी रणे, आशा टकले, कविता शेटे, सविता दुधाणे आदी सदस्य अधिक परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे आभार नामदेव कोरके यांनी मानले.यावेळी भोसे व पंचक्रोशीतील राजुबापूंवर प्रेम करणारी कार्यकर्ते तसेच पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरहू पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी. देविदास जमदाडे, स्वप्नील तळेकर, नितीन कुंभार, उमेश श्रीखंडे, कोंडीबा कोरके आदींनी विशेष परिश्रम घेतले.
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴