स्वेरीमध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

0
           पंढरपूर (प्रतिनिधी) - गोपाळपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.  
        स्वेरीच्या भव्य मैदानावर अथांग पसरलेल्या हिरवळीवर चारही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भारताचा हा ७८ वा स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. कोमल कसबे यांनी सुमधुर चालीत ‘ए वतन तेरे लिये...’ हे ‘कर्मा’ चित्रपटातील गीत गायले. श्रुष्टी भोसले यांनी भारताची कालची व आजची परिस्थिती सांगून स्वातंत्र्यानंतर भारताची स्थिती यावर इंग्रजी भाषेतून आपले विचार मांडले. सुदिक्षा जगताप ह्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने अभ्यासपूर्ण भाषणात इंग्रजांनी केलेले अत्याचार, स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेले शूरवीर पासून ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने केलेली आजपर्यंतची प्रगती यावर भाष्य केले. वैकुंठी जाधव व ओम गाढवे यांनी ‘स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगून युवकांचे कार्य कसे असावे यावर सर्वस्पर्शी विचार व्यक्त केले. तर अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी ‘स्वातंत्र्यानंतर भारतातील शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील प्रगती सांगून स्वेरीच्या शैक्षणिक उपक्रमातील महत्वाचे टप्पे सांगताना स्वेरी, संशोधन विभाग, सोबस, ग्रामीण मानव संसाधन विकास केंद्र (आर.एच.आर.डी.एफ.), नवीन शिक्षण प्रणाली (एनईपी २०२०), या शैक्षणिक बाबींवर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांपुढील स्पर्धात्मक आव्हाने आणि पुढील जबाबदारी' यावर प्रकाश टाकला.
         भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘स्वेरीयन’ या त्रैमासिकाचे तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांतील विविध विभागांच्या न्यूज बुलेटीन्सचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.एस.व्ही. मांडवे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसीचे विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते. साक्षी शिंदे, स्नेहा पिसे व प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन केले तर मिठाई वाटपाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)