पंढरपूर (प्रतिनिधी) - १५ ऑगस्ट भारताचा ७८ वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त येथील निशिगंधा बँकेतर्फे देशभक्ती पर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योगभवन, भक्तीमार्ग येथे गुरूवारी संध्याकाळी पार पडलेल्या "दिल दिया है, जान भी देंगे.... ए वतन तेरे लिये" या कार्यक्रमात लकी कराओके चे रफिक शेख व त्यांचे सहकलाकारांनी आपल्या भारदस्त आवाजात देशभक्ती पर गाणी गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
सुरुवतीस प्रथितयश उद्योजक व सुप्रभात मंडळाचे अध्यक्ष धनाजी (बापु) देशमुख यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन आर. बी. जाधव होते. यावेळी स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन माजी सैनिक श्री. उत्तम कदम यांचा बँकेच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास कल्याणराव काळे, व्हा. चेअरमन् सतीश लाड, संचालक बी.बी. सावंत, महेश पटवर्धन, अनिल निकते, अॅड. क्रांती कदम, या बरोबरच डॉ. एम. आर. टकले, डॉ. राजेंद्र जाधव, देवानंद गुंड-पाटील, सुनिल पाटील, अर्जुन जाधव, नारायण शिंदे, उध्दव (वापु) बागल, यशवंतराव चव्हाण ना. सह. पतसंस्थेचे चेअरमन् शहाजी साळुंखे, महादेव देठे, अॅड. रविकिरण कदम, अगस्ती देठे, अॅड. राजेश भादुले, भारत गदगे, सिराळ सर, विवेक कवडे, बंडू पवार, विकास पवार, राजेंद्र नरसाळे, प्रशांत फराटे यांच्या बरोबरच बँकेचे सभासद, ठेवीदार व हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी पार पाडणे करिता बँकेचे सरव्यवस्थापक कैलास शिर्के व कर्मचारी वर्ग, यांनी परिश्रम घेतले.