निष्काम कर्मयोग हेच मोठ्या मालकांचे जीवन : मा. इंद्रजीत देशमुख

0
श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त कर्मयोगी इंस्टीट्यूट मध्ये व्याख्यान
 
         पंढरपूर (प्रतिनिधी) - आदरणीय सुधाकरपंत परिचारक अर्थात मोठ्या मालकांचे जीवन हे समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी व्यतीत केले होते. त्यांनी उभे आयुष्य समाजातील सर्व घटकांना व त्यांच्या समस्येला प्राधान्य देऊन काम केले. त्यांनी कोणत्याही स्वार्थ न बघता जनतेच्या समस्या सोडविल्या. मोठे मालक हे खर्‍या अर्थाने आधुनिक काळातील "संत" असून निष्काम कर्मयोग हेच त्यांचे जीवन होते असे मत प्रसिद्ध व्याख्याते मा. इंद्रजीत देशमुख यांनी व्यक्त केले. श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त दि १७ ऑगस्ट रोजी कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालय शेळवे येथे आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये “आयुष्य घडविताना.... “ या विषयावर ते बोलत होते. श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त मा. रोहन परिचारक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
             यावेळी बोलताना मा. इंद्रजीत देशमुख यांनी मोठ्या मालकांच्या ठायी असणार्‍या विविध गुणांवर प्रकाशझोत टाकला. तसेच आयुष्य घडविताना आवश्यक असणारी नीतीमुल्ये, आयुष्यातील आई वडिलांचे स्थान, तरुणपिढीचा मोबाइलचा अतिरिक्त वापर, वाचनाचे महत्व अश्या अनेक विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
         कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रोहन परिचारक यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कर्मयोगी या शब्दाचा अर्थ म्हणजे कोणती ही अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय आणि त्याचप्रमाणे मोठ्या मालकांनी ही समाजसेवा करताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा किंवा स्वार्थ न ठेवता जनतेची कामे केली आणि म्हणूनच त्यांना कर्मयोगी म्हंटले जाते असे सांगून त्यांनी मोठ्या मालकांप्रती आदरांजली वाहिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी मोठ्या मालकांचे कार्याबद्दलची विस्तृत माहिती प्रास्ताविकामध्ये सादर केली. 
           यावेळी प्रा. जगदीश मुडेगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मा. रोहन परिचारक यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे मा. इंद्रजीत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. 
        सदर कार्यक्रमाला श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त मा. रोहन परिचारक, पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य प्रा. गुरुराज कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. जे. एल. मुडेगावकर, रजीस्ट्रार श्री. गणेश वाळके तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रा. सुशील कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. जगदीश मुडेगावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)