पंढरपुर (प्रतिनिधी) - येथील निशिगंधा बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन् आर. बी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना ९ टक्के जाहीर करण्यात आला. गत चौदा वर्षात निशिगंधा बँकेने सभासद व ठेवीदारांची विश्वासार्हता जपत कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली समाधानकारक प्रगती केली आहे.
यावेळी बँकेचे मार्गदर्शक व संचालक कल्याणराव काळे यांनी गेल्या चौदा वर्षाचा बँकेच्या प्रगतीचा आढावा सभासदांसमोर ठेवला आणि लवकरच बँकेची स्वमालकिची इमारत उभी करण्याचा मानस बोलून दाखविला, यावेळी व्हा. चेअरमन् सतिश लाड, संचालक देविदास सावंत, बी. बी. सावंत, डॉ. मंदार सोनवणे, भागवत चवरे, वैभव साळुंखे, महेश पटवर्धन, अनिल निकते संचालिका ऍड. सौ. क्रांती कदम, सौ. शोभा येडगे उपस्थित होते.
यावेळी "आदर्श सभासद" म्हणून गोपाळ शिंदे, दत्तात्रय लोकरे, महेश काळे, संभाजी नाईकनवरे, अविनाश गव्हाणे, अर्जुन झांबरे, समीर बागवान श्रीमती अलका घाडगे, सौ. वैशाली बिडकर या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सभेच्या पुर्वी एक तास सभासदांसाठी आयोजित केलेल्या "सभासद प्रशिक्षण" वर्गामध्ये सहकार प्रशिक्षण केंद्र, शाखा सोलापूर यांचे प्रतिनिधी जितेंद्र चव्हाण यांनी सभासदांचे हक्क व कर्तव्ये, याबाबतची सखोल माहिती यावेळी उपस्थितांना दिली.
निशिगंधा सहकारी बँकेच्या सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षांतील कामकाजाचा आढावा घेताना कल्याणराव काळे म्हणाले की, मार्च २०२४ अखेर बँकेचे ४८३६ सभासद असून बँकेकडे रू. ३६.५० कोटींच्या ठेवी असून, रू.१९.९७ कोटींचे कर्जवाटप केलेले आहे व रू. १५.८८ कोटींची गुंतवणूक केली आहे. चालू अर्थिक वर्षात बँकेस रू.४२.३५ लाख रूपयांचा नफा झालेला आहे लवकरच बँकेचे एटीएम सुरू होत असून आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेतून बँकेने १५० तरूण उद्योजकांना रू.१२ कोटींचा कर्ज पुरवठा केलेला असून या योजनेतून लाभार्थ्यांना रू.१.२५ कोटी चा व्याज परतावा मिळालेला आहे. या योजनेचा तरूणांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा तसेच अल्प व्याजदरात सोनेतारण, सी. टी. एस. चेकबुक, आरटीजीएस, एनएफईटी, ई-पेमेट, तसेच शाखा भाळवणी येथे सेफ डिपॉझिट लॉकर्सची सोय इ. सेवा बैंक देत आहे त्याचा लाभ सर्व सभासदांनी घ्यावा.
सभेच्या सुरूवातीस श्री. विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ सभासद श्रीमती मुक्ताबाई पिसे, नितीन ताड व इतर मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. सरव्यवस्थापक कैलास शिर्के यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले, त्यास सभासदांनी आवाजी मतदानाने मंजूरी दिली. यावेळी अहवाल सालातील दिवंगत सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सभेस स. शि.व. का. साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन् भारत कोळेकर, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. सुधीर शिनगारे, उत्तमराव जमदाडे (गुरूजी), संजय काळे (सर), सुधाकर कवडे, अतुल महमाणे, रमेश कुलकर्णी, नितीन देवकर, महेश सावंत, धनंजय कुलकर्णी, बाळासाहेब काळे (गुरूजी), निलेश शेंडगे, सतीश कटकोंड, रामचंद्र जाधव, कृतांजली सावंत, संजीवनी शिरसाठ आदि बहुसंख्येने उपस्थित होते. आभार व्हा. चेअरमन सतिश लाड यांनी मानले.