मा. कल्याणराव काळे यांची विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या आमदार व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मागणी

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. कल्याणराव काळे यांची राज्यपाल कोट्यातून विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख आमदार व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन आग्रही मागणी केली.

          माढा विधानसभा मतदारसंघाचे आ. बबनदादा शिंदे, करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजयमामा शिंदे, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आ. यशवंततात्या माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते कल्याणराव काळे यांचा सामाजिक, शैक्षणिक, सहकार अशा विविध क्षेत्रातील कार्याचा अहवाल उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. राज्यपाल कोट्यातून विधान परिषद सदस्यपदी कल्याणराव काळे यांची राष्ट्रवादीतर्फे नियुक्ती केली जावी, अशी शिफारस आणि आग्रही विनंती सर्वांनी केली.

          कल्याणराव काळे यांनी गेली २२ वर्षांपासून सहकार, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, बँकिंग, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केले असून ते अविरतपणे चालू आहे. त्यानुसार राज्यपाल कोट्यातून भारताची दक्षिण काशी व तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषद सदस्यपदी कल्याणराव काळे यांची नियुक्ती व्हावी, अशी आग्रही एकमुखी भूमिका सर्वांनी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडे मांडली.

            यावेळी कल्याणराव काळे यांचे बरोबर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, जेष्ठ मार्गदर्शक महादेव देठे, संचालक मोहन नागटिळक, दिनकर कदम, राजाराम पाटील, सुनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन हरीदास मुजमुले, राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारिणी सदस्य नारायण शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष सुळे हे उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)