श्रीसंत सावता महाराजांनी शेतीच काम हाच विठ्ठल मानून कर्म केले - ह.भ.प. रोहिणी परांजपे

0
वै. दादा महाराज मनमाडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नामसंकीर्तन सोहळा उत्साहात साजरा

         पंढरपूर (प्रतिनिधी) - प्रतिवर्षाप्रमाणे वै.ह.भ.प. दादा महाराज मनमाडकर यांच्या ११ व्या स्मृतिप्रित्यर्थ आज एकेदिवशीय नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  मनमाडकर परिवाराचे वतीने नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करताना आज महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार रोहिणी माने-परांजपे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी सुरुवातीला श्रीसंत तुकाराम महाराजांच्या "अमृताची फळे अमृताची वेली" या सुंदर अभंगावर निरुपण करताना सांगितले की… समाज घडवत असताना अनेक संतांनी आपल्या समाजाला चांगल्या मार्गाने चालावयास सांगितले. तरच आयुष्य सुखकर होणार आहे. दादा महाराज मनमाडकर यांनी वारकरी संप्रदायात केलेल्या कार्याचे काम आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असणार आहे असे सांगितले.
         सध्याच्या काळात मनुष्य भौतिक सुविधा आणि साधनांच्या मागे लागला असून खऱ्या परमेश्वरी आनंदाचा  क्षण विसरत चालला असलेला दिसत आहे. लहान मुलांना शुभंकरोती म्हणा ऐवजी त्यांच्या हातात आईवडील मोबाईल फोन देत आहेत. ही समस्या भयंकर परिणाम भविष्यात करणार आहे. त्यावेळी सर्वांनी जागृत होणं गरजेचं आहे. आहार विहार चांगलं असण आवश्यक आहे. उत्तर रंगामध्ये श्रीसंत सावता महाराज यांचे समाधी सोहळाचे औचित्य साधून त्यांच चरित्र अतिशय सुंदर रित्या सांगितले. "कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी" शेती काम हेच अखंड कर्म मानत विठूरायाच्या शेतात आपण काम करतोय ते मनोभावे करायचं, तेही विठ्ठल मात्रा घेत घेत यांचा परिणाम भगवंत स्वतः विठ्ठल दर्शन देण्यासाठी अरणगावी आले. संत सावता महाराज कधीही पंढरीला दर्शनासाठी गेले नाही पण प्रत्येक ठिकाणी विठ्ठल भरला असून प्रत्येका बरोबर प्रेमानं वागावं. तिथच भगवंताचा वास आहे असे सांगून अनेक दृष्टांत देत पंढरपूर मधील सर्व  उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.त्यांना तितकीच सुरेख सुंदर तबला साथ ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनियम साथ वैभव केंगार यांनी केली. त्यानंतर दादा महाराज मनमाडकर यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. आणि उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भगवान भाऊ मनमाडकर, शुभांगीताई मनमाडकर, मनमाडकर परिवाराने अधिक परिश्रम घेत नामसंकीर्तन सोहळा यशस्वी करण्यात आला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)