स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर (ऑटोनॉमस) च्या विविध अभ्यास मंडळांकडून (बीओएस) उद्योगाभिमुख नवीन अभ्यासक्रम मंजूर
पंढरपूर (प्रतिनिधी) - स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरला युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशन (युजीसी) व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरकडून अलीकडेच ‘ऑटोनॉमस’ तथा ‘स्वायत्त दर्जा’ बहाल करण्यात आला आहे. सन १९९८ साली सुरु झालेल्या स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या शैक्षणिक वाटचालीतील हा एक महत्वाचा टप्पा असून त्यामुळे उद्योग जगतास आवश्यक असणारी कौशल्ये प्रदान करणारा नवीन अभ्यासक्रम तयार करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची संधी महाविद्यालयास उपलब्ध झाली. त्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाचा दर्जा तपासून त्याला मान्यता देण्यासाठी विविध विभागांच्या अभ्यास मंडळांनी (बीओएस) महाविद्यालयास भेट देऊन तसेच ऑनलाईन उपस्थित राहून उद्योगाभिमुख नवीन अभ्यासक्रमास मंजुरी दिली. या अभ्यास मंडळांचे सर्व सदस्य हे शिक्षण व औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ व मान्यवर आहेत.
स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर मध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. या सर्व विभागांच्या सर्व विषयांच्या अभ्यास मंडळांची बैठक स्वेरीमध्ये नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्व विषयांच्या अभ्यासक्रमांबाबत सांगोपांग चर्चा करून उपस्थित तज्ञांची मते आजमावण्यात आली व त्या अनुषंगाने योग्य ते बदल सुचवण्यात आले. सदर अभ्यासक्रम तयार करताना नवीन शैक्षणिक धोरण २०२० मधील मार्गदर्शनपर तत्वांचा देखील अंतर्भाव करण्यात आला आहे.
सिव्हील इंजिनिअरींगच्या अभ्यास मंडळामध्ये बांधकाम व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये मा. अभिनव साळुंखे (उपाध्यक्ष, क्रेडाई, सोलापूर), मा.मोहन पाटील (आर्किटेक्ट, पंढरपूर), प्रा. जी. आर. पाटील (सहयोगी प्राध्यापक, पिल्लई कॉलेज), प्रा. डॉ. सी.बी.पोळ (सहयोगी प्राध्यापक, वालचंद महाविद्यालय), प्रा. डॉ. एस. सी. देशमुख (सहयोगी प्राध्यापक, वालचंद महाविद्यालय, सोलापूर), डॉ. आर.एच. जाधव (सहयोगी प्राध्यापक, भारती विद्यापीठ, पुणे), डॉ. एस.एस. पाटील (प्राचार्य, एस.व्ही.आय.टी., सोलापूर), डॉ. प्रशांत पवार (प्र. अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, पु. अ. हो. सो.वि. सो.), डॉ. एस.पी. पाटील (विभागप्रमुख) यांचा समावेश आहे. या विभागाच्या अभ्यासक्रमात ग्रीन बिल्डिंग तंत्रज्ञान, लवचिक पायाभूत सुविधा आदी अद्ययावत तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या अभ्यास मंडळात डॉ. सागर सपकाळ (सहयोगी प्राध्यापक, वालचंद, सांगली) डॉ. सत्यजीत पाटील (सहयोगी प्राध्यापक, आर.आय.टी., साखराळे), डॉ.प्रदीप जाधव (प्राचार्य, भारती विद्यापीठ), डॉ. अशोक मच्चे (सहयोगी प्राध्यापक, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट, पुणे), डॉ.दिनेश कांबळे (प्राध्यापक, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट, पुणे), डॉ.गणेश शिरसाट (असिस्टंट मॅनेजर, फोर्स मोटर्स, पुणे), डॉ. भाग्येश देशमुख (विभागप्रमुख, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, वालचंद कॉलेज, सोलापूर), डॉ. बी.पी. रोंगे (संस्थापक सचिव, स्वेरी व प्राचार्य, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर), डॉ. श्रीकृष्ण भोसले (विभागप्रमुख) आदी या बैठकीत उपस्थित होते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये सस्टेनेबल डिझाईन, एडवांस्ड मटेरियल आणि इंडस्ट्री ४.० आदि बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या अभ्यास मंडळामध्ये डॉ. दगडू मोरे (सहयोगी प्राध्यापक, वालचंद कॉलेज, सांगली), डॉ. अन्वर मुल्ला (प्राचार्य, दौलतराव आहेर महाविद्यालय, कराड), मा. सतीश गुंजे (मॅनेजर, लक्ष्मी हायड्रोलिक्स, सोलापूर), डॉ. अर्चना ठोसर (प्राध्यापक, सीओईपी, पुणे), मा. कुणाल खंडेलवाल (ऍप्लिकेशन इंजिनिअर, पुणे), डॉ. दीप्ती तंबोळी (विभागप्रमुख), डॉ. एम.पी. ठाकरे (शैक्षणिक अधिष्ठाता, स्वेरी) हे मान्यवर उपस्थित होते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग च्या अभ्यासक्रमामध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि स्मार्ट ग्रीड आदि बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरींगच्या अभ्यास मंडळात डॉ. श्रीनिवास महाजन (प्राध्यापक, सीओईपी, पुणे), डॉ.संजयकुमार गोवरे (प्राध्यापक, जेएसपीएम, पुणे), मा. बालाजी गायकवाड (मॅनेजर, रिलायन्स जिओ), मा.सर्वेश रत्नपारखी (वरिष्ठ क्लाउड इंजिनिअर, काँगा), डॉ. संगीता जोशी (प्राध्यापक, विद्यालंकार इन्स्टिट्यूट, मुंबई), डॉ. अरुण गायकवाड (माजी प्राचार्य, पी.आय.सी.टी., पुणे), मा.कुणाल खंडेलवाल (ॲप्लिकेशन इंजिनिअर, पुणे), डॉ.कु.शिल्पा मेटकर (सहा. प्राध्यापक, सीओईपी, पुणे), प्रा.विजयकुमार बिरंगे (कॅडेन्स डिझाईन सिस्टम्स, बंगलोर), डॉ.सुनील कोरे (रिटायर्ड प्रोफेसर, वालचंद, सांगली), डॉ.सौ.मीनाक्षी पवार (उपप्राचार्य, स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग), डॉ. सुमंत आनंद (विभागप्रमुख) हे मान्यवर उपस्थित होते. या विभागाच्या अभ्यासक्रमात ए. आय. मशीन लर्निंग, रोबोटिक्स, आयओटी, स्वायत्त प्रणाली, वेअरेबल इलेक्ट्रॉनिक्स, फाईव्ह-जी तंत्रज्ञान, व्हीएलएसआय डिझाइन, सेमी कंडक्टर, सीटूएस प्रोपोजल, अल्टीयम डिझाईन (इंडस्ट्री स्टॅन्डर्ड) आदी अद्ययावत तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला.
कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरींगच्या अभ्यास मंडळामध्ये डॉ. पी. जे. कुलकर्णी (माजी प्राचार्य, वालचंद महाविद्यालय, सांगली), डॉ. एस. आर. पाटील (सहयोगी प्राध्यापक, पुणे), श्रीमती ए.एम. मोरे (सहाय्यक उपाध्यक्ष, डॉइश बँक, पुणे), डॉ. टी.ए. चव्हाण (प्राचार्य, सिद्धेश्वर महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर), डॉ. ए.सी. आडमुठे (प्राध्यापक, आर.आय.टी., राजारामनगर) डॉ. सौ. एस. पी. पवार (विभागप्रमुख) यांचा समावेश आहे. या विभागाच्या अभ्यासक्रमात एज कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल), डीप लर्निंग, डेटा सायन्स आणि बिग डेटा ॲनालिटिक्स आदी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
एमबीए विभागाच्या अभ्यास मंडळामध्ये डॉ. उमेश देशमुख व डॉ. अमर जाधव (प्राध्यापक, छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट, कोल्हापूर), डॉ. संभाजी बी. सावंत (विद्यापीठ प्रतिनिधी), प्रा. अमोल रणदिवे (विश्वकर्मा युनिवर्सिटी, पुणे), डॉ. गणराज माने (सहा. प्राध्यापक, अभिजित कदम इन्स्टिट्यूट, सोलापूर), डॉ. राजशेखर येळीकर (प्राध्यापक, स्वेरी), प्रा.सूरज रोंगे (सहा.प्राध्यापक, स्वेरी), डॉ. कमल गलानी (विभागप्रमुख), हे मान्यवर उपस्थित होते. एमबीए विभागाच्या अभ्यासक्रमात ग्लोबल बिझनेस स्ट्रॅटेजी, सस्टेनेबिलिटी आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, रिमोट आणि हायब्रिड वर्क मॅनेजमेंट आदी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
प्रथम वर्ष इंजिनिअरींग च्या अभ्यास मंडळांतर्गत डॉ. गुणवंत बिराजदार (सहा. प्राध्यापक, आयसीटी, मुंबई), डॉ. सर्फराज मुजावर (सहा. प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा), मा. स्नेहल काटे (सिनिअर डिझाईन इंजिनिअर, ऍटलास काप्को), डॉ. सतीश लेंडवे (विभागप्रमुख) आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी, थ्रीडी मॉडेलिंग आणि सिम्युलेशन, पायथन फॉर इंजिनिअरिंग, एम्बेडेड सिस्टम बेसिक्स, रिन्यूएबल एनर्जी इंटिग्रेशन, सिम्युलेशन आणि मॉडेलिंग, ग्रीन केमिस्ट्री आणि एनर्जी स्टोरेज, नॅनोटेक्नॉलॉजी, ॲप्लिकेशन-ओरिएंटेड लर्निंग, सॉफ्टवेअर टूल्स आदी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
एमसीए च्या अभ्यास मंडळांतर्गत डॉ. अभिजित कवडे (संचालक, एईएसआयएमआर, पुणे), डॉ. विनोद कुमार (अधिष्ठाता, शाहू कॉलेज, पुणे), सौ. जयश्री मदने (सॉफ्टवेअर इंजिनिअर, हैद्राबाद), डॉ. महादेव पाटील (सहा. प्राध्यापक, भारती विद्यापीठ, पुणे), डॉ. आनंद चव्हाण (सहा. प्राध्यापक, पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ), प्रा. मनसब शेख (विभागप्रमुख) आदी मान्यवर उपस्थित होते. एमसीए च्या अभ्यासक्रमात मशीन लर्निंग आणि एआय, डीप लर्निंग, क्लाउड कॉम्प्युटिंग आदी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरला अलीकडेच नॅकची ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह 'ए-प्लस' ही ग्रेड मिळालेली आहे. त्याशिवाय महाविद्यालयातील पदवीच्या पात्र अभ्यासक्रमांना तीनदा एनबीए मानांकन मिळाले आहे. सन २०२३ मध्ये इनोव्हेशन या गटात एनआयआरएफ मध्ये १५१-३०० च्या दरम्यान स्थान मिळवले आहे याशिवाय ओबीई रँकिंग २०२३-२४ मध्ये महाविद्यालयास ‘डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स’ हा दर्जा मिळालेला आहे. स्वेरीतील नवीन अभ्यासक्रमाची सानुकूलित अभ्यासक्रम, बहुविद्याशाखीय दृष्टीकोन, उद्योग सहयोग आणि इंटर्नशिप, संशोधन आणि नवोपक्रम केंदित, लवचिकता, कौशल्य विकास आणि उद्योजकता, सातत्यपूर्ण मूल्यांकन आणि मूल्यमापन, शिक्षणात तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण ही वैशिष्ट्ये आहेत.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी या बैठकी दरम्यान संस्थेच्या वाटचालीबाबत माहिती देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने स्वागत केले. तसेच सर्व अभ्यास मंडळांच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला मिळालेल्या ‘ऑटोनॉमस’ दर्जा मुळे स्वेरीतील शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावून स्वेरीच्या विद्यार्थ्यांना नोकरीभिमुख व अधिक दर्जेदार शिक्षण मिळणार हे नक्की.