साप्ताहिक पंढरी संदेशचा आधारवड हरपला

0
          साप्ताहिक पंढरी संदेशचे आधारस्तंभ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यदिन ब्रह्मवृंद संस्थेचे मार्गदर्शक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प. बाळशास्त्री हरिदास यांना दि. 8/8/2024 रोजी रात्री वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली. 
     ह. भ. प. बाळशास्त्री हरिदास यांनी आपले जीवनात अध्यात्माचा प्रसार, प्रचार तसेच अखंड नामस्मरणाचा ध्यास घेतला होता. सेवाधारी घराण्यात जन्म घेऊन श्रीपांडुरंगाची अजीवन निसिम सेवा त्यांनी केली. साप्ताहिक पंढरी संदेशच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
         वारकरी संप्रदायातील युवकांचे आधारस्तंभ असणारे, कोणत्याही शंका कुशंकांचे जागेवर निवारण करणारे शास्त्री महाराज आज आपल्यातून गेले आहेत.  त्यांच्या जाण्याने संत वाङ्मयात जी मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून निघणार नाही.
        त्यांची अंत्ययात्रा सकाळी 9:00 वाजता हरिदास वेसीतील राहते घरापासून निघेल.
"गेले दिगंबर ईश्वर विभूती l
राहिल्या त्या कीर्ती जगा माझी ll"
       साप्ताहिक पंढरी संदेश परिवार "हरिदास कुटुंबियांचे" दुःखात सहभागी आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)