श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्र तपासणी

0
            पंढरपूर (प्रतिनिधी) - सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, आपल्या सर्वांचे दैवत सहकारतपस्वी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ "पांडुरंग परिवार युवक आघाडीच्या वतीने" पंढरपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्र तपासणी व (लेन्स बसवून) मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे सालाबादप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे..
         खर्डी आणि क्रोशीतील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, युवा सहकारी यांच्यहस्ते नवव्या शिबिराचा शुभारंभ झाला, आपले नेते आ. प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोळ्या विषयक समस्या सोडवण्यासाठी आम्ही शिबिराच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षापासून प्रयत्न करत आहोत.
         गेल्या ४० वर्षात स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी तालुक्याला दिशा देण्याचे कार्य केले, आज त्यांच्या पश्यात त्यांनी घालून दिलेला आदर्श जोपासण्याचा प्रयत्न करत.. "मोतीबिंदू मुक्त पंढरपूर तालुका" करण्याचा संकल्प आम्ही सर्व युवा सहकाऱ्यांनी केला असल्याचे यावेळी सांगितले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)