पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील आपटे उपलप प्रशाला, पंढरपूर चा चिं अभिषेक संतोष लालबोंद्रे (इ १०वी) याची शालेय विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
त्याबदद्ल पंढरपूर तालूका गटशिक्षणाधिकारी श्री. मारुती लिगाडे साहेब यांचे हस्ते त्याचा सत्कार करुन अभिनंदन केले व त्याला पुढील स्पर्धेसाठी शिक्षण मंडळाचे श्री. रामचंद्र बोडरे साहेब, कुंभार साहेब, संस्थेचे सचिव बी. जे. डांगे सर व रमेश थोरात सर यांनीही शुभेच्छा दिल्या.
याशिकाय चि. विराज ज्ञानेश्वर शिंदे, चि. राहूल सुनिल राठोड, चि. गजानन रामेश्वर ननवरे, चि. गोकुळ बाळासो अधटराव, चि. अथर्व उमेश कारंडे, चि. केशवराज सतीश पंचभाई, चि. सोहम राहूल अभंगराव यांनी जिल्हापातळीवर यश मिळवले.
यावेळी मुख्याध्यापक श्री. दत्तात्रेय धारुरकर, पर्यवेक्षक अनिल अभंगराव, क्रिडाशिक्षक गुलाखे सर, नरेंद्र डांगे, आबा खरात व कुसूमडे सर, माऊली सितापराव, नरेंद्र औसेकर सर, वि वि मंडळ प्राथमिक विद्यालयाचे मुख्या. कांबळे सर व शिक्षक सहकारी उपस्थित होते