इंजिनिअरिंग व एमसीएच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड-१ चे ऑप्शन्स फॉर्म भरण्याची प्रक्रिया दि.०९ ऑगस्ट पासून सुरू

0
स्वेरी तर्फे विविध ठिकाणी सदर फॉर्म भरण्याची मोफत सुविधा 

         पंढरपूर (प्रतिनिधी) - 'शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रथम वर्ष इंजिनिअरिंग व एमसीए प्रवेशाची पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड)चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया शुक्रवार, दि.०९ ऑगस्ट २०२४ पासून ते रविवार, दि.११ ऑगस्ट २०२४ पर्यंत म्हणजेच  एकूण तीन दिवस चालणार आहे. या कालावधीत स्वेरी अभियांत्रिकीच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६२२०) मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय करण्यात आली आहे. प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या या पहिल्या प्रवेश फेरीची अलॉटमेंट यादी अधिकृत संकेतस्थळावर बुधवार दि. १४ ऑगस्ट, २०२४ रोजी तर एमसीए ची अलॉटमेंट यादी दि. १३ ऑगस्ट, २०२४ प्रसिद्ध होणार आहे. ज्यांनी पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी किंवा एमसीए प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन केले आहे त्यांना या प्रवेश फेरीचा लाभ घेता येईल.’ अशी माहीती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
        सन २०२४-२५ मध्ये पदवी अभियांत्रिकीच्या व एमसीए च्या प्रवेशाकरीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, व निश्चिती करणे आदी  प्रक्रिया पूर्ण झाल्या, त्यानंतर या प्रक्रियेला मुदतवाढही देण्यात आली होती व त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. पुढे प्रवेश अर्जातील चुका व त्रुटींची दुरुस्ती (ग्रीव्हेंन्स) करण्याची प्रशासनाकडून मुभा देण्यात आली होती. या सर्व प्रक्रीयेनंतर पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड) चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया शुक्रवार, दि.०९ ऑगस्ट, २०२४ पासून ते रविवार, दि.११ ऑगस्ट, २०२४ पर्यंत या तीन दिवसात होणार आहे. या पहिल्या फेरीमध्ये योग्य आणि पसंतीचे महाविद्यालय अथवा योग्य ब्रँच बाबतचे पसंतीक्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत. यासाठी विद्यार्थी व पालकांनी पूर्णपणे अभ्यास करून कॅप राऊंड-१ चे ऑप्शन फॉर्म भरणे अत्यंत गरजेचे आहे. 
           शुक्रवार, दि.९ ऑगस्ट, २०२४ ते रविवार, दि.११ ऑगस्ट, २०२४ या कालावधीत स्वेरीमार्फत सांगोला, बार्शी, महूद, मंगळवेढा, करकंब, अकलूज, करमाळा, कुर्डूवाडी, अक्कलकोट, सोलापूर, माढा, मोहोळ, धाराशिव, टेंभुर्णी, आटपाडी, नळदुर्ग व जत या महत्वाच्या ठिकाणी प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या कॅप राऊंड –१ चे ऑप्शन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर ठिकाणी स्वेरीचे तज्ञ प्राध्यापक व त्यांचे सहकारी उपलब्ध असणार आहेत. त्यांचे संपर्क क्रमांक विद्यार्थी व पालकांपर्यंत लवकरच पोहचवले जातील. तरी पालक व विद्यार्थ्यांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा.’ असे आवाहन करण्यात आले आहे.
           महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, वसतिगृह सुविधा, इतर सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, संशोधने, मानांकने या महत्वाच्या बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे. प्रथम वर्ष इंजिनिअरिंगसाठी पहिल्या प्रवेश फेरीचे जागावाटप (अलॉटमेंट) बुधवार, दि.१४ ऑगस्ट रोजी तर एमसीए च्या पहिल्या फेरीचे जागावाटप १३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित केले जाणार आहे. पहिल्या फेरीच्या जागावाटपानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करावी लागणार आहे. प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४) व प्रा.उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर  तर  एमसीए च्या प्रवेशासंदर्भात प्रा. मनसब शेख (९०२८९०७३६७) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच अभियांत्रिकीला सातत्याने मिळत असलेल्या अभूतपूर्व यशाची पार्श्वभूमी, तसेच महाविद्यालयास मिळालेला ऑटोनॉमस दर्जा यामुळे पहिल्या फेरीला विक्रमी गर्दी होणार आहे, हे मात्र निश्चित.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)