नवजीवन रुग्णालयात मोफत बाल हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन

0
             पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील नवजीवन बाल रुग्णालयात मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन नुकतच संपन्न झाले. आय एम ए, आय ए पी, आर बी एस के, आणि पंढरपूर येथील उप जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने या मोफत बाल हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवजीवन बाल रुग्णालयाचे सर्वश्री डॉ. शितल शहा, प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी सचिन इथापे, पुणे येथील सुप्रसिध्द बाल हृदयरोग तज्ञ डॉ. संतोष जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उप जिल्हा रुग्णालय प्रमुख डॉ. महेश सुडके आदी मान्यवर उपस्थित होते.

              गेल्या चाळीस वर्षांपासून केवळ लहान मुलांच्या सेवेत देव पाहून आपले सर्वस्व, आयुष्य बाल रुग्ण सेवेसाठी अर्पित केलेलें व्रतस्थ, धीरोदात्त व्यक्तिमत्त्व असणारे डॉ. शीतल शहा यांनी या शिबिराच्या माध्यमातून दोनशे पन्नास पीडित बालकांची मोफत तपासणी करून समुपदेशन केले. सुप्रसिध्द डॉ. संतोष जोशी यांनी शिबिराला आलेल्या बालकांची तपासणी करून पालकांना विशेष सूचना, कोणती काळजी घ्यायची याविषयी सविस्तर विवेचन करुन सजग केले.

           प्रमुख पाहुणे म्हणून सचिन इथापे प्रांत अधिकारी पंढरपूर, डॉ. शितल के. शहा बालरोग तज्ञ आय एम ए अध्यक्ष, डॉ. संतोष जोशी बाल हृदयरोग तज्ञ, डॉ. महेश सुडके वैद्यकीय अधीक्षक, डॉ. एकनाथ बोधले तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. रवी आहेर बालरोग तज्ञ, डॉ. सुधीर आसबे बालरोग तज्ञ, डॉ. सुखदेव कारंडे बालरोगतज्ञ, डॉ. अभिजीत पाटील भूलतज्ञ, डॉ. गजानन बागल स्त्रीरोग तज्ञ, डॉ. प्रशांत निकम कन्सल्टंट ऑर्थोपेडिक अँड जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, इत्यादी कर्मचारी व डॉक्टर्स उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)