युवकांच्या मागणीनंतर आ. समाधान आवताडे यांनी मुख्याधिकाऱ्याना कारवाईची सूचना
पंढरपूर (प्रतिनिधी) - लिंक रोड आणि उपनगरी भागातील नागरिकांच्या सुरक्षीततेसाठी नागालँड चौकात गतिरोधक आवश्यक आहे, अशी मागणी नागालँड चौकातील सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिकांनी आ.समाधान आवताडे यांच्याकडे केली. त्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन आ. आवताडे यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्याना फोन करून गतिरोधक करण्यासंदर्भात सूचना केली. त्यामुळे नागालँड चौकातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
आ.समाधान आवताडे हे शनिवारी मनीषा नगर भागात आले असता लिंक रोड वरील नागालँड चौकातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन गतिरोधक करण्याची मागणी केली. आ. आवताडे यांनी लागलीच चौकात थांबून फुटपाथवर बाकड्यावर बसून त्यांच्याशी चर्चा केली. आणि तिथूनच नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांना फोन करून गतिरोधक करण्याविषयी सूचना केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनंजय धोत्रे, राजन थोरात, किरण देवकते, भैय्या मांदळे, शिरीष थोरात, श्रीपाद श्रीखंडे, आशिष कदम, संकेत लिगाडे, शांतीलाल पवार, सारंग चौगुले, गणेश लिंगे, चिन्मय शिनगारे, आनंद भोसले, शेखर पवार आदी उपस्थित होते.