कॅम्पस इंटरव्युवद्वारे विद्यार्थिनींची निवड
पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘कॅपजेमिनी’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील आठ विद्यार्थिनींची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.' अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
‘कॅपजेमिनी’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून दीक्षा रणजित ससाणे, निकिता ज्ञानेश्वर पोरे, प्रज्ञा अनिल रेपाळ, रोहिणी बिभीषण राऊत, ऋतुजा संजय माने, समृद्धी दत्तात्रय मसलेकर, वैष्णवी संतोष मांडवे व स्वराली श्रीरंग जोशी या आठ विद्यार्थिनींची निवड केली. या विद्यार्थिनींना प्रत्येकी वार्षिक रु.४ ते ७.५ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमधून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. स्वेरीचे विद्यार्थी आज विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यात आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. ‘स्वेरी’ मधून विविध कंपन्यात प्लेस होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येते. विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत स्वतंत्रपणे कुशल प्रशिक्षकांद्वारे एप्टीट्युड, कम्युनिकेशन स्कील, टेक्निकल स्कील, विविध सॉफ्टवेअर्स, मॉक इंटरव्युव्ह यांचे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाते. या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. एकीकडे स्वेरीने प्रवेश प्रक्रियेत व वार्षिक परीक्षेच्या निकालात मारलेली गरुड झेप दिसून येते. सदर विद्यार्थिनींना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, उपप्राचार्य डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.