पंढरपूर (प्रतिनिधी) - आपटे उपलप प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी सौ. वर्षाताई बडवे या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी असून त्या संस्थेच्या स्नेहांकित, हितचिंतक असून संस्थेसाठी सदैव मदत करतात. इनरव्हील क्लबच्या माध्यमातून प्रशालेसाठी त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. बोलक्या भिंती , पाण्याच्या बेसिन ची सोय, गरजू विद्यार्थ्यांना मदत , मुलांना सवलतीच्या दरात सर्कसची सोय इत्यादि मदत केली आहे; त्याबद्दल प्रशाला त्यांची ऋणी आहे.
इनरव्हील क्लबच्या नूतन चीफ प्रेसिंडेंट झाल्यामुळे त्यांचा प्रशालेत सौ. सर्वगोड मॅडम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्याध्यापक श्री. दत्तात्रेय धारुरकर व पर्यवेक्षक श्री. अनिल अभंगराव सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जेष्ठ शिक्षक श्री. खरात सर यांनी केले. प्रशालेचा सर्व शिक्षकवृंद त्यावेळी उपस्थित होता. सर्वांनीच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे कुटुंबप्रमुख मा. सचिव श्री. बा. ज. डांगे सर यांनीही त्यांचे अभिनंदन केले.