पंढरपूर (प्रतिनिधी) - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयटी गुरुकुल स्कूल, पंढरपूर येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूलचा दणदणीत विजय झाला.
संघातील मुलांची नावे : १४ वर्षाखालील मुले- शंभुराजे गवळी प्रथम क्रमांक, मयुरेश पवार तृतीय क्रमांक, राजवीर डोंगरे पाचवा क्रमांक.
१७ वर्षाखालील मुली- वाणीश्री अमोल घाडगे तृतीय क्रमांक
१७ वर्षाखालील मुले- शौर्य चौगुले द्वितीय क्रमांक
१९ वर्षाखालील मुली- सिद्धी अनुप सावंत द्वितीय क्रमांक, ईश्वरी गाढवे तृतीय क्रमांक. दीक्षा जाधव चौथा क्रमांक ,१९ वर्षाखालील मुले- मुस्तफा जमादार पाचवा क्रमांक.
रिदमिक योगामध्ये १४ वर्षाखालील मुले- शंभुराजे गवळी प्रथम क्रमांक, १७ वर्षाखालील मुले- शौर्य चौगुले प्रथम क्रमांक, १७ वर्षाखालील मुली- धैर्या बेद्रे द्वितीय क्रमांक, वाणीश्री घाडगे तृतीय क्रमांक, १९ वर्षाखालील मुली- ईश्वरी गाढवे तृतीय क्रमांक, १९ वर्षाखालील मुले- मुस्तफा जमादार प्रथम क्रमांक.
विजयी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक पल्लवी पाटील, कविता कटारिया आणि भूषण तायडे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे प्राचार्य शिवाजी गवळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.