मोहोळ मतदार संघातील विविध कामासाठी ग्रामविकास विभागाची मंजुरी
पंढरपूर (प्रतिनिधी) - मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी, मतदार संघातील विकास साधण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तर ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास विभागामार्फत एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मोहोळ मतदार संघातील विकास कामासाठी,यापूर्वीही कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. विविध गावातील नागरिकांचे मागणीनुसार खरे यांनी २५\१५ योजने अंतर्गत कामे मंजूर करण्यात यावीत.अशी मागणी मुख्यमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री यांचेकडे केली होती. त्यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यास यश आले असुन, मोहोळ मतदार संघातील १० गावामध्ये १ कोटी रुपयांचे कामास मंजुरी मिळाली आहे.
मोहोळ मतदारसंघातील हराळवाडी येथील अंत्रोळी रस्ता ते बाळासाहेब हराळी रस्ता खडीकरण करणे (१० लाख रुपये ), चळे येथील अभ्यासिका केंद्र दलित वस्ती बांधण्यासाठी ( १० लाख रुपये ), उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी येथे बाळूमामा मंदिरासमोर सभामंडप बांधणी ( १० लाख रुपये ), उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले या ठिकाणी खुनेश्वर रोड ते दशरथ करंडे वस्ती पर्यंत रस्ता करण्यासाठी (१० लाख रुपये ), मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील भीम नगर येथे समाज मंदिर बांधणीसाठी ( १० लाख रुपये ), पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव या ठिकाणी समता नगर दलित वस्तीमध्ये समाज मंदिर बांधण्यासाठी ( १० लाख रुपये ), मोहोळ तालुक्यातील राम हिंगणी या ठिकाणी प्रशस्त असे ग्रामसचिवालय उभारणीसाठी ( २५ लाख रुपये ), यासह पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली या ठिकाणी भीम नगर गोरख प्रक्षाळे घर ते नवनाथ ससाने घरापर्यंत काँक्रीट रस्ता तयार करण्यासाठी ( १० लाख रुपये ), पंढरपूर तालुक्यातील सरकोली या ठिकाणी बळी घोडके घर ते ज्ञानेश्वर आठवले यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक बसविण्यासाठी ( ५ लाख रुपये ), याप्रमाणे निधीस मंजुरी देण्यात आली आहे. यापुढील काळातही आणखी निधी मंजूर करून घेणार असल्याचेही राजू खरे यांनी सांगितले.
-------------------------------------------------
खरे यांना बळ देण्यासाठीच
कोट्यावधींचा निधी
मोहोळ विधासनभा मतदार संघातून उद्योजक राजू खरे हे आगामी विधानसभा निवडणुकीत आपला कार्यकर्ता आमदार व्हावा. याच प्रमुख हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष घालून मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी राजू खरे यांच्या मागणीनुसार कोट्यावधीचा निधी दिला आहे. सरकारी निधी बरोबरच स्वतः पदरमोड करीत, खरे यांनी मोहोळ मतदार संघात विकास साधला आहे. यामुळेच राजू खरे यांचे नाव मोहोळ मतदार संघात घराघरात पोहोचले आहे.
-------------------------------------------------