महामार्गावर कुख्यात आरोपीस पिस्तूल, दोन जिवंत काडतूससह पकडले

0
स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी 

सोलापुर ते विजापुर महामार्गावरील तेरामैल येथुन, मिरज येथील कुख्यात आरोपी पिस्टलसह जेरबंद

          सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक पोलिसांनी सोलापुर ते विजापुर महामार्गावरील तेरामैल येथून मिरज येथील कुख्यात आरोपीस पिस्टलसह जेरबंद केले. त्या विरोधात मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्या नंतर आगामी विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची बैठक घेवून त्यांना मालाविषयी व शरीरा विषयी गुन्हे करणा-या आरोपिंवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करून गुन्हे नियंत्रण आणणेबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सुचना दिल्या होत्या. त्यावरून सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्हे प्रतिबंध व प्रकटीकरणकामी मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. पोलीस उप-निरीक्षक सुरज निंबाळकर व त्यांचे पथक सोलापूर तालुका पोलीस ठाणे आवारातील स्थानिक गुन्हे शाखा, कार्यालयात हजर असताना पोहेकॉ विजयकुमार भरले यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,  राहुल माने नावाचा इसम  रा. मिरज, जि. सांगली हा अंगात गजगा- निळया रंगाचा हाफ टि शर्ट व निळया रंगाची जिन्स पॅन्ट घालून सोलापूर ते विजापुर या महामार्गावर असलेल्या तेरामैल येथील ब्रिज खाली एक देशी बनावटीचे पिस्टल व राउंड सोबत बाळगून उभा आहे.
          सोलापुर ते विजापुर हायवे वर असलेल्या तेरा मैल ब्रीज जवळ असणा-या सर्व्हीस रोड वर बातमीत नमूद वर्णनाप्रमाणे इसम दिसून आल्याने त्यास लागलीच गराडा घालून जागीच पकडले. सदर इसमास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल सतीश माने वय-31 वर्षे रा. वसंत हाउसिंग सोसायटी माजी सैनिक वसाहत ता. मिरज जि. सांगली असे असल्याचे सांगितले. नमुद इसमाची तपासणी केली असता त्याच्या कंबरेला मागील बाजूस पॅन्टीत खोचलेला एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह मिळून आली. त्यानंतर त्याचे खिसे तपासले असता त्याचे खिशात पिस्टलच्या 02 जिवंत काडतुसे मिळुन आले. सदर आरोपी राहुल सतीश माने याचे विरूध्द मंद्रुप पोलीस ठाणेत भारतीय हत्यार अधिनियम 1959 चे कलम 3, व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मंद्रुप पोलीस ठाणे करीत आहे. नमुद आरोपी याचे गुन्हे अभिलेख पाहता यापुर्वी त्याचेवर सांगली जिल्हयात मिरज शहर, महात्मा गांधी, एमआयडीसी, चिंचणीवांगी, भिलवडी या पोलीस ठाणे मध्ये दरोडा, एनडीपीएस अॅक्ट,आर्म अॅक्ट , चोरी, घरफोडी या सारखे तसेच नारायणपुरा पो.ठाणे बेंगलोर राज्य कर्नाटक येथे आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे.
       सदरची कामगिरी पोलीस उप-निरीक्षक, सुरज निंबाळकर, व पथकातील ग्रेड पोउपनि राजेश गायकवाड, ग्रेड पोउपनि ख्वाजा मुजावर, पोहेकॉ परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, पोकॉ घोरपडे, समर्थ गाजरे, चापोकॉ अशोक हलसंगी यांनी बजावली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)