भाजपा जिल्हा कार्यकारणी महिला मोर्चाचे वतीने 'हातमाग दिन' साजरा

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) -  ७ ऑगस्ट 'राष्ट्रीय हातमाग दिन' म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी स्वदेशी चळवळीचा शुभारंभ झाला, आणि ७ ऑगस्ट 2015 रोजी हातमाग दिन हा चेन्नई मध्ये घोषित झाला आणि त्यानंतर संपूर्ण देशामध्ये हातमाग वस्तू विकत घेण्याची लाट ही निर्माण झाली.

         यामध्ये खादी किंवा आपल्या भारतामध्ये तयार होणाऱ्या सर्व वस्तू ह्या घरोघरी पोहोचल्या, वास्तविक ०७ ऑगस्ट १९४५  हा स्वदेशी चळवळीचा दिवस असल्याने, या माध्यमातून देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र भाई मोदी हे स्वदेशी वस्तूंना आणि त्याचबरोबर आपल्या लोकांच्या कामाला चालना मिळावी आणि ते स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभे राहावेत या साठी ते नेहमीच प्रयत्न करीत असतात.

          आज पंढरपूर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी महिला मोर्चा त्याचबरोबर जिल्हा संयोजक  या सर्वांच्या वतीने 'हातमाग दिन' साजरा करण्यात आला.

           यावेळी पंढरपुरातील अत्यंत जुने खादीचे दुकान म्हणजेच 'खादी ग्रामोद्योग' या ठिकाणी जाऊन सर्वांनी खादीचे रुमाल खादीचे शर्टचे कापड, त्याचबरोबर स्वदेशी बनावटीचे गुलकंद अशा अनेक वस्तू विकत घेतल्या. आणि आज हातमाग दिवस साजरा केला.

         या खादी ग्रामोद्योग दुकानचे मालक मोहनदादा आरस यांच्याकडे जाऊन सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खादीचे कपडे त्याचबरोबर इतर हातमागाच्या वस्तू खरेदी केल्या आणि त्यांच्या आनंदात भर घातली.

       यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संयोजक श्री.बादल सिंह ठाकुर त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ.प्राजक्ता बेणारे, जिल्हा उपाध्यक्ष त्याचबरोबर हातमाग समिती इन्चार्ज सुजाता ताई वगरे, जिल्हा सरचिटणीस व हातमाग को-इन्चार्ज 
सरिता ताई मुडे, जिल्हा उपाध्यक्ष सौ. जयश्री ताई क्षीरसागर, जिल्हासरचिटणीस सौ.अंजना ताई जाधव, शक्ती केंद्रप्रमुख पार्थ बेणारे, तसेच हरिपाठ हॉटेलचे मालक व युवा उद्योजक सुदर्शन दादा निंबाळकर आणि हातमाग खादी ग्रामोद्योगचे मालक श्री. मोहनदादा आरस हे सर्वजण उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)