कासेगाव येथे विचारविनिमय बैठकीत वसंतनाना देशमुख यांनी "तुतारी" चिन्हावर निवडणूक लढवावी - समर्थकांची मागणी
पंढरपूर (प्रतिनिधी) - माझे देशमुख जरी नाव असलं तरी मी सर्वसामान्य माणसातला माणूस आहे. मला सर्वसामान्य माणसांची ओळख व त्यांच्यासोबत राहण्याची, वागण्याची व त्यांच्यासोबत काम करण्याची सवय ही माझ्या वडीलधाऱ्यापासून लाभलेली आहे. सर्वसामान्य तळागाळातला माणसाच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या अडचणीमध्ये मदतीला जाण्याची भूमिका आम्हा देशमुख कुटुंबाची आहे. मी तीच परंपरा पुढे चालवीत आहे. त्यामुळे माझे आडनाव जरी देशमुख असले तरी मी सामान्य माणसांमधील सामान्य माणूस आहे. असे आज वसंत नाना देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या विचार विनिमय बैठकीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये लोकांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्धार मी व माझ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते पवार साहेब यांना आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. म्हणून येत्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये मी माझी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कडे मागणी केली आहे. असे देखील वसंत नाना देशमुख यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केले.
यावेळी या विचारविनिमय बैठकी साठी पंढरपूर येथील माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले तसेच माजी नगरसेवक मोहम्मद वस्ताद संतोष नेहतराव त्याचप्रमाणे कित्येक पंचायत समितीचे सदस्य सरपंच उपसरपंच आणि मंगळवेढा तालुक्यातील मान्यवर नेतेमंडळी उपस्थित होते.
वसंत नाना देशमुख आपल्या भाषणामध्ये ते पुढे म्हणाले या आगामी विधानसभेसाठी नागेश काका भोसले हे देखील इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे राहुल शहा शहा शेटजी चे चिरंजीव हे देखील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.आम्ही तिघे तयार आहोत आम्हा तिघांच्या पैकी कोणाला जरी उमेदवारी मिळाली तरी आम्ही तिघे मिळून उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. अशी गवाही वसंत नाना देशमुख यांनी आपल्या विचारविनिमय बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या समोर आपले मनोगत व्यक्त केले.
वसंत नाना देशमुख यांनी निमंत्रित केलेल्या या विचारविनिमय बैठकीला हजारो वर्ष संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाला आपलेसे करून या चिन्हावर निवडणूक लढवावी असे एकमुखाने जमलेले कार्यकर्त्यांनी सांगितले.