मंदिर समितीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन

0
पं.रघुनंदन पणशीकर, गंधार देशपांडे, नागेश आडगावकर, अवधूत गांधी, मंगेश बोरगांवकर, सार्थक शिंदे यांची लाभणार उपस्थिती
          पंढरपूर (प्रतिनिधी) - श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित श्री गणेशोत्सवानिमित्ताने महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक गायिका यांच्या उपस्थितीत संगीत महोत्सव संपन्न होणार आहे.
          श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या अथक परिश्रमातून दिनांक ८ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या काळात श्रीसंत तुकाराम भवन येथे रात्री ८:०० ते १०:०० या वेळेत संगीत महोत्सव संपन्न होणार आहे.
         रविवार ८ सप्टेंबर रोजी ख्यातनाम गायक अवधूत गांधी आळंदी यांचा लोकसंगीत आणि पोवाडा गायनाचा कार्यक्रम, गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर "स्वप्न सुरांचे तरुणाईचे" मंगेश बोरगावकर सहकलाकार लातूर  यांचा कार्यक्रम, शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी स्टार प्रवाह उपविजेता फेम सार्थक शिंदे सहकलाकार आळंदी  यांचा स्वरसार्थक कार्यक्रम, शनिवार १४ सप्टेंबर ख्यातनाम शास्त्रीय गायक गंधार देशपांडे मुंबई यांचा स्वरगंधार शास्त्रीय व अभंग गायन, रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी नागेश आडगांवकर पुणे यांचा अभंगवाणी संतांची कार्यक्रम तर या संगीत महोत्सवाची सांगता सोमवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी किशोरीताई आमोणकर यांचे शिष्य रघुनंदन पणशीकर यांच्या बोलावा विठ्ठल या कार्यक्रमाने होणार आहे. या सर्वांना भरत कामत, स्वप्नील भिसे, पांडूरंग पवार, रोहन पंढरपूरकर, समर्थ उकरंडे, महेश बधे, तबला साथ तर सिध्देश बिचोळकर, अभय नलगे, श्रीहरी मेंदकर, ज्ञानप्रसाद फुलारी, शुभम खंडाळकर, ‌सोहम साने, एम. आर. चेतन, अभी पवार हार्मोनियम साथ तर ज्ञानेश्वर दुधाणे, राजेंद्र बघे पखवाज साथ तर सोमनाथ तरटे संबळ, शिवराज पंडीत, ऋषिकेश साळवे, प्रसाद भांडवलकर, टाळाची साथसंगत करणार आहेत.
        तरी या भरगच्च कार्यक्रमाला पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कला रसिक श्रोते आणि कलासाधक मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहून या संगीत मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले आहे.महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व मंदिरे समितीचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)