लायसन्स इंजिनियर असोसिएशन तर्फे "इंजिनिअर डे" साजरा

0
             पंढरपूर (प्रतिनिधी) - देशात इंजिनिअर बिल होणे गरजेचे आहे.आज पर्यंत संसदेत 4-5 वेळा इंजिनीयर बिल मांडले गेले परंतु ते पास होऊ शकले नाही, त्यामुळे इंजिनीयरना कायद्याने कोणतेही संरक्षण मिळत नाही. ऍडव्होकेट ऍक्ट आणि डॉक्टर ऍक्ट सध्या लागू असल्यामुळे त्यांना  व्यवसायासाठी कायदेशीर मार्गदर्शन आणि संरक्षण आहे. मात्र इंजिनियर कायद्या अभावी बळी ठरत आहेत. म्हणून सर्व इंजिनिअरनी एकत्र येऊन चांगल्या वाईट परिस्थितीत एकमेका सोबत संघटित राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन इंजिनिअर मिलिंद अंकलगी यांनी केले. ते लायसन्स इंजिनिअर असोसिएशन तर्फे घेण्यात येणाऱ्या इंजिनिअर निमित्ताने बोलत होते. याप्रसंगी त्यांनी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली.

             या कार्यक्रमाच्या उद्घाटन  असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनिअर सारंग कोळी, विकेट कंपनीचे  इंजिनियर केदार जोशी, मिलिंद अंकलगी, इंजि.सोमनाथ काळे, इंजि.राजकुमार आटकळे, इंजि.सचिन माळवदे व अजित पवार यांनी प्रतिमा पूजन करून केले.                                 प्रमुख पाहुण्यांची ओळख आर्किटेक्ट बाळकुमार व इंजिनीयर ललित पाटील यांनी करून दिली. मान्यवर मिलिंद अंकलगी यांचा सत्कार सोमनाथ काळे यांनी तर केदार जोशी यांचा सत्कार सारंग कोळी यांनी केला.
           कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष सारंग कोळी यांनी केली. याप्रसंगी बोलताना इंजिनिअर असोसिएशने गेली वर्षभरात सर्वांसाठीचे किती उपयुक्त काम केले याबद्दलची माहिती दिली. यानंतर विकेट सिमेंट कंपनीचे तीन राज्याचे टेक्निकल हेड इंजिनिअर केदार जोशी यांनी कंपनीच्या सिमेंट प्रोडक्ट बद्दलची सविस्तर माहिती दिली. सदरची कंपनी ही जागतिक दर्जाची असून ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात व ग्रीन बिल्डिंग पर्पज साठी कशी उपयुक्त रित्या काम करते हे त्यांनी पटवून सांगितले. यानंतर श्री भैरोबा एजन्सीचे मालक अजित पवार यांनी इंजिनिअर डे निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन सिमेंट सप्लाय करण्यासाठी पंढरपुरात हब केले असल्याचे सांगितले. त्याला कंपनीचे अलोक नंदा सर व अतुल पवार यांनी दुजोरा दिला. या कार्यक्रमात उपस्थित सर्व इंजिनिअरचे व कंपनीच्या सर्व टीमचे आभार असोसिएशनचे सचिव सोमनाथ काळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित पाटील यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)