गौरी गणपती सणानिमित्त अनिलदादा सावंत मित्र मंडळाकडून विधायक उपक्रमाचे आयोजन

0
गणेशोत्सवा निमित्त २ हजार कुटूंबाना मोफत गणेश मूर्ती भेट तर ५० हजार आरती संग्रहाचे मोफत वाटप....

          पंढरपूर (प्रतिनिधी) - मंगळवेढा तालुकयातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यात मोठा जनसंपर्क असलेले या कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांचा पंढरपुर शहर तालुक्यातही मोठा जनसर्पक असल्याने  तसेच पंढरपुर शहर तालुकयातील विविध विधायक  उपक्रमात देखील त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. 
         पंढपुरातच ते वास्तव्यास असल्याने या भागातील  प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व अशी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत.आता आगामी गौरी गणपती सणानिमित्त अनिलदादा सावंत मित्र मंडळाकडून विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पंढरपुर शहरात विविध भागात गणेशोत्सवा निमित्त २ हजार कुटूंबाना मोफत गणेश मूर्ती भेट देण्यात येणार आहेत. तर ५० हजार आरती संग्रह तसेच २०० फलकही वितरित करण्यात येणार आहे.
          व्हाईस चेअरमन अनिलदादा सावंत यांनी आता पर्यंत राबविलेले विधायक उपक्रम व सामाजिक कार्याची माहिती देणाऱ्या  ५० हजार परिचय पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार आहे. शिवसेनेचे जिल्हा संघटक संजय बंदपट्टे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी बागल, पंढरपुर शहर प्रमुख विश्वजीत भोसले, संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष स्वागत दादा कदम, माऊली गांडूळे, अमोल अटकळे, शाम गोगाव सर, समाधान जाधव, गुरू ठिगळे,
कृष्णदेव लोंढे,  बंडू जाधव, तानाजी चव्हाण, देवकर गुरुजी सुभाष साळुंखे, गणेश घोडके  आदींच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)