वसंतराव काळे प्रशालेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने शासकीय मैदान नेहरूनगर येथे झालेल्या सोलापूर जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या गटात वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोलीच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत अजिंक्यपद प्राप्त केले.

            या संघाची पुणे विभागीय खो -खो स्पर्धेसाठी निवड झाली असून विभागीय खो-खो स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
          वसंतराव काळे प्रशालेच्या संघाने पंढरपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना पहिल्या सामन्यात उत्तर सोलापूर, वडाळा या संघाचा एक डाव सतरा गुणांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मंगळवेढा तालुका बालाजीनगर संघाचा एक डाव पंधरा गुणांनी पराभव केला. सेमी फायनलच्या सामन्यात सांगोला तालुका, शिवणे संघाचा एक डाव बरा गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात पावसामुळे मोहोळ तालुका अनगर संघाने वसंतराव काळे प्रशालेच्या संघास पुढे चाल दिल्याने वसंतराव काळे प्रशालेने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.
         संघाची कर्णधार साक्षी देठे अष्टपैलू खेळाडू स्नेहा लामकाने, कल्याणी लामकाने, ऋतुजा पासले, श्रावणी कस्तुरे, श्रुती कस्तुरे, समृद्धी जगताप, समृद्धी सुरवसे, अमृता सुरवसे, श्रावणी देठे, ऋतुजा यलमार, सानिका चव्हाण, आयेशा शेख, वैष्णवी काळे,पल्लवी बोराडे या खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करत संघाला प्रथम क्रमांक मिळवून दिला. सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अतुल जाधव सहकारी समाधान काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
 सर्व खेळाडू व मार्गदर्शक प्रशिक्षकांचा सत्कार श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी सचिव बाळासाहेब काळे, महादेव देठे यशवंत पतसंस्थेचे चेअरमन शहाजी बापू साळुंखे, नारायण शिंदे प्राचार्य संजय कुलकर्णी पालक अनिल लामकाने नौशाद मुजावर उपस्थित होते. सर्व खेळाडू व प्रशिक्षकांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी तालुका क्रीडा अधिकारी  सत्येन जाधव, सुप्रिया गाढवे, सोलापूर खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, सचिव अजित संगवे, सर्व पदाधिकारी प्राचार्य संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक शब्बीर शेख पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)