विद्यार्थ्यांचा सर्वांगीण प्रगतीसाठी कर्मयोगी कटिबद्ध : डॉ. एस. पी. पाटील,

0
कर्मयोगी इस्टिट्यूट मध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत व पालकसभा संपन्न
  
पालक व विद्यार्थी यांचा उदंड प्रसिसाद
           पंढरपूर (प्रतिनिधी) -  कर्मयोगी इंस्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मयोगी महाविद्यालय कटिबद्ध असून त्यांना अभियांत्रिकीच्या शिक्षणाबरोबरच एक यशस्वी अभियंता निर्माण होण्यासाठी लागणारी सर्व कौशल्ये विद्यार्थ्यांमद्धे विकसित केली जातील. अभियांत्रिकीच्या प्रवासात कठोर परिश्रम केल्यास तुमची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. विद्यार्थ्यानी व पालकांनी अभियांत्रिकी शिक्षणासाठी कर्मयोगी इंस्टीट्यूटवर विश्वास ठेऊन प्रवेश घेतला व प्रचंड प्रतिसाद दिला तो विश्वास निश्चितच सार्थ ठरवू असे प्रतिपादन कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉंजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी केले.
         दि १८ सप्टेंबर २०२४ रोजी प्रथम वर्ष २०२४ मध्ये अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत व पालक सभा संपन्न झाली त्या प्रसंगी ते बोलत होते. सदरच्या मेळाव्याला पालक व विद्यार्थी प्रचंड संख्येने उपस्थित होते. 

           सुरूवातीला सर्व मान्यवर व पालक प्रतिनिधी विष्णु पाटील व सौ. अश्विनी भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालय स्थापनेपासूनचा यशाचा चढता आलेख उपस्थितांसमोर सादर केला. त्यानंतर विभागप्रमुख प्रा. अनिल बाबर, प्रा. एस एम लंबे, प्रा. डॉ. एस. व्ही. एकलारकर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने यांनी संबंधित विभागातील अभ्यासक्रम व त्यामधील नोकरीच्या संधी यांवर मार्गदर्शन केले. 
ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसिन शेख यांनी अभियांत्रिकीच्या शिक्षणामद्धे विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या ट्रेनिंग संबंधित माहिती दिली तसेच त्यांना उपलब्ध असणार्‍या नोकरीच्या संधी यावर मार्गदर्शन केले. संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी संशोधन क्षेत्रामद्धे काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून अधिक यशस्वी अभियंता होण्यासाठीचा विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला. द्वितीय वर्षयामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनी सुहानी यादव, वैष्णवी रननवरे यांनी महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली..   
            श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी.कणसे, रजीस्ट्रार श्री. जी. डी. वाळके, उप प्राचार्य प्रा. जे. एल. मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात,  विभागप्रमुख प्रा. अनिल बाबर, प्रा. सोमनाथ लंबे, डॉ. एस. व्ही. एकलारकर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कु. साक्षी भिंगे व रामरत्नराजे जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. एन. डी. तिवारी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)