नरखेड गटात मा. आ. राजनजी पाटील व आ. यशवंत माने यांचे जंगी स्वागत

0


        मोहोळ (प्रतिनिधी) - मोहोळ तालुक्यातील नरखेड जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो गेल्या अनेक वर्षांपासून या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. आ. राजनजी पाटील, आ.यशंवत माने हे नरखेड येथे आले असता त्यांचे जंगी स्वागत केले.


        मा.आ. राजनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नरखेड गटातून माजी आमदार राजनजी पाटील, लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील व अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार यशवंत माने यांना सात हजार मताधिक्य मिळाले होते. आज नरखेड येथे विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार राजनजी पाटील यांच्या शुभहस्ते नरखेड या ठिकाणी विविध विकास कामाचे उद्घाटन प्रसंगी  माजी आमदार राजनजी पाटील व आमदार यशवंत माने यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

        यावेळी नरखेड विभागातील अनेक मतदार या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाला लोकांची प्रचंड गर्दीने नरखेड हाऊसफुल्ल झाले होते. माजी आमदार राजनजी पाटील व आमदार यशवंत माने यांना क्रेनच्या साह्याने मोठा हार घालून नरखेड गटातील कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजनजी पाटील व यशवंत माने यांना हस्तांदोलन करून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि कार्यकारी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता. कार्यकर्त्यांनी अनेक घोषणा दिल्या. यावेळी नरखेड परिसरात फटाक्याची आतिषबाजी करून नरखेड विभागातील कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजनजी पाटील व यशवंत माने यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

         यावेळी प्रकाश चौरे हनुमंत पोटरे जगनाथ कोल्हार नाना धवन बबन दगडे नागेश साठे सभापती रत्नमाला पोतदार शुभांगी लंबे बाळासाहेब पाटील शहाजी मोठे उत्तम मोठे शिवाजी उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)