स्वेरीचे सामाजिक कार्य कौतुकास्पद - अधिक्षिका श्रीमती राजश्री गाडे

0
स्वेरीतर्फे नवरंगे बालकाश्रमाला पाणी शुद्धीकरण यंत्र भेट

        पंढरपूर (प्रतिनिधी) –‘विशेष करून ग्रामीण भागात ‘स्वेरी’ ही शिक्षणसंस्था शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक कार्यात देखील सातत्याने सहभाग घेवून स्तुत्य कार्य करत असते. स्वेरीचे विद्यार्थी प्रत्येक सामाजिक व विधायक कार्यात तहान भूक विसरून मनापासून कार्य करत असतात. स्वेरीचे सामाजिक कार्य खरोखर कौतुकास्पद असते.’ असे प्रतिपादन पंढरपूर शहरातील नवरंगे बालकाश्रम व्यवस्थापनाच्या अधिक्षिका श्रीमती राजश्री गाडे यांनी केले. 
        स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरने सामाजिक सेवेची आणखी एक चुणूक दाखवत एक स्तुत्य उपक्रम राबवला. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार आणि उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या सहकार्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या ‘इलाईट फोरम’ मार्फत पंढरपूर मधील वा. बा. नवरंगे बालकाश्रमाला पाणी शुद्धीकरण यंत्र भेट देण्यात आले. यावेळी व्यवस्थापनाच्या  अधिक्षिका श्रीमती राजश्री गाडे मार्गदर्शन करत होत्या. सामाजिक कार्य करताना आपल्या देण्याने दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो भेट वस्तूच्या किमतीच्या कितीतरी पटीने अधिक असतो. नवरंगे बालकाश्रमाच्या व्यवस्थापनाकडून अधिक्षिका राजश्री गाडे, व्यवस्थापक सुचित्रा पवार आणि लेखाधिकारी धर्मराज डफळे यांनी स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेली ही कृती महाविद्यालयाच्या समाज कल्याणासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. हे पाणी शुद्धीकरण यंत्र बालकाश्रमातील मुलांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. नवरंगे बालकाश्रमाच्या व्यवस्थापनाने स्वेरीच्या या भेटवस्तू बाबत आभार मानले. सदरची वस्तू ही बालकाश्रमातील मुलांचे आरोग्य जतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाने एकता आणि सामूहिक जबाबदारीचा संदेश दिला, जो स्वातंत्र्य दिनाच्या खऱ्या अर्थाला अधोरेखित करतो. स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे समाजाच्या प्रगतीसाठी अविरतपणे कार्य करत आहे. या देणगी समारंभात बालकाश्रमाचे लेखाधिकारी धर्मराज डफळे, इलाईट फोरमचे समन्वयक प्रा. एस. आर. वाघचवरे, प्रा. एम.ए. सोनटक्के, प्रा. एस.एस. गावडे, प्रा. ए. ए. गरड, इलाईट फोरमचे अध्यक्ष तुषार बर्ले आणि गिरीजा देशमुख यांच्या सह इलाईट फोरमचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)