येत्या दि. १५ व १६ सप्टेंबर रोजी स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २४’ या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन
पंढरपूर (प्रतिनिधी) – स्वेरीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे सुप्त गुण व कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारे विविध उपक्रम राबवले जातात. त्यातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळत असते. याचाच एक भाग म्हणून येत्या दि. १५ व दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी स्वेरीमध्ये ‘ऑलम्पस २ के २४’ या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे व इतर मान्यवरांच्या हस्ते या ‘ऑलम्पस २ के २४’ या तांत्रिक स्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन करण्यात आले. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘ऑलम्पस २ के २४’ या तांत्रिक स्पर्धेत जवळपास २३ इव्हेंट्स आयोजित केले आहेत ज्यात ड्रॉ-कॅड, टेक्नो-मेक क्विझ, मेक-टेक एक्सटेम्पोर, ब्रीज मेकिंग, कॅड रेस, सिव्हिल एक्सटेम्पोर, मिनी हॅकाथोन, कोड वॉर, पोस्टराईज- पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोग्राम मनिया, पेपर प्रेझेंटेशन, अॅग्रो चॅलेंज प्रोजेक्ट स्पर्धा, कॅम्पस ड्राईव्ह, जस्ट अ मिनिट टायपिंग इत्यादी स्पर्धांचा समावेश आहे. विजेत्यांना एकूण एक लाखांपर्यंतची रोख बक्षिसे, स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. या तांत्रिक स्पर्धेत अभियांत्रिकी तसेच पदविका अभियांत्रिकीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी अध्यक्षा सोनाली करवीर, उपाध्यक्ष अनिल पिसे व तुषार बनसोडे, विद्यार्थी सचिव राज रोंगे, सहसचिव स्नेहा पिसे, खजिनदार ओंकार जाधव, सहखजिनदार प्रतीक गोडसे, अनिकेत वाघमोडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. ‘ऑलम्पस २ के २४’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी समन्वयक प्रा. दिगंबर काशीद (८२०८७२४२६६), प्रा. सचिन काळे (९९६०११८५८०), प्रा. सागर वाघचवरे (९६६५१८७८७५), प्रा. धनराज डफळे (९७६८५१५०२३), प्रा. पृथ्वीराज गुंड (८७९३०४३०८३) व प्रा. निमिषा देवल (९६८९६३८३४४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त एन. एस. कागदे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस. व्ही. मांडवे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.