श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्या वतीने श्रीरुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांची उपस्थिती
पंढरपूर (प्रतिनिधी) - श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या अथक परिश्रमातून प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या श्रीरुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सव रात्री ७:३० ते १०:०० या वेळेत श्रीसंत तुकाराम भवन येथे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर रोजी भारतरत्न पं.भिमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांचे गायन, शनिवार ५ ऑक्टोबर रोजी ख्यातनाम गायक पं.शौनक अभिषेकी महोत्सवात यांचा स्वराभिषेक, रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी ओंकार कला अकादमी चेन्नई व अतुल खांडेकर यांचे गायन, सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी वैष्णवी मगर यांचे अभंगगायन, मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी उस्ताद रशीद खान यांचे शिष्य कृष्णा बोंगाणे यांचा दुमदुमली पंढरी, बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी राम विधाते व बजरंग विधाते बंधूचे गायन तर गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी शर्वरी वैद्य मुंबई व धनंजय जोशी नांदेड या ख्यातनाम गायक-गायिकांचा रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात सहभाग असणार असून त्या सर्व कलाकारांना तबला सुभाष कामत, पांडूरंग पवार, तेजोव्रत जोशी, निसर्ग देहूकर, कार्तिक स्वामी, माऊली खरात, हार्मोनिअम उदय कुलकर्णी, लीलाधर चक्रदेव, ओंकार पाठक, माधव लिमये, निवेदन उमेश बागडे, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे तर टाळ शिवराज पंडीत, अक्षय तळेकर, शरद जाधव, सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सर आदी कलाकार करणार आहेत.
यावेळी पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कला रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत.