मोटारसायकल चोरी करणा-या दोन अट्टल चोरट्यांना अटक

0
 १० लाख ७० हजार रु किंमतीच्या १८ मोटर सायकली  हस्तगत

        पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर  
शहर पोलिसांच्या गून्हे प्रकटीकरण शाखेने दमदार कामगिरी करून चोरीला गेलेल्या दहा लाख ७० हजार रू किमतीच्या १८ मोटारसायकल सह दोन अट्टल आरोपींना जेरबंद कऱण्यात यश मिळविले आहे.
        या प्रकरणी  लखन शिवराय लोहार रा. आळंदी रोड साई कॉम पुणे १५ जि. पुणे हा भटुंबरे गावामध्ये आल्याचे माहिती मिळाल्याने, दि.०५ ऑक्टोबर रोजी आरोपीस सापळा रचुन गुन्हे प्रकटीकरण शाखा पंढरपुर शहर पोलीस ठाणे यांनी पकडले.

          आधिक चौकशी केल्यावर  त्याने पंढरपूर शहरातून व पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, येथील एकुण १८ मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यांची किंमत दहा लाख ७० हजार रू अशी आहे. यावरुन पोलीसांनी विनोद बळीराम घुले, रा.कळंब, जि.धाराशिव  यालादेखील ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , सोलापूर ग्रामीण अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या सूचनेनसार सहा पोलीस उप अधीक्षक डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके 
यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने चोरट्यांना मुद्देमालासह पकडण्यात यश मिळविले आहे. शरद कदम, बिपिन ढेरे, सूरज हेंबाडे, नितीन पलुस्कर,सचिन हेंबाडे, नवनाथ माने, समाधान माने, बजरंग बीचुकले, निलेश कांबट, रतन जाधव 
यांनी कौशल्यपूर्ण कामगीरी करीत चोरट्यांना पकडले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)