पंढरपूर शहर गुन्हे शाखेची विदेशी दारू बेकायदेशीर रित्या विक्री करणारे इसमावर कारवाई

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहर गुन्हे शाखेने विदेशी दारू बेकायदेशीर रित्या विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई केली आहे. आगामी विधानसभा -२०२४ चे निवडणुकीचे अनुशंगाने १,४९,३४०/-रू ची फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेली विदेशी दारू बेकायदेशीर रित्या पंढरपुरात विक्री करणारे इसमावर कारवाई करण्यात आली.
 
        याबाबत अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्हयात आगामी विधानसभा २०२४ चे अनुशंगाने जिल्हयातील सर्व अवैद्य व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे आदेशान्वये अर्जुन भोसले, सहा पोलीस उपअधिक्षक पंढरपुर विभाग पंढरपुर व  विश्वजीत घोडके वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर पोलीस ठाणे ह‌द्दीत लखन मुकेश अभंगराव रा. सहयादी नगर इसबावी, पंढरपुर, ता. पंढरपुर याचे घराचे खोली मध्ये विदेशी बनावटीची फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी उपलब्ध असलेला दारू साठा विक्री करण्यासाठी आपले कब्जात बाळगुन त्याचे विक्री करण्याचे तयारीत असल्याबाबत माहिती मिळाले नंतर  लखन मुकेश अभंगराव रा. सहयाद्री नगर इसबावी, पंढरपुर, ता. पंढरपुर याचे घराचे खोली मध्ये जावुन पाहिले असता अमोल करकंबकर रा. जुनी पेठ, पंढरपुर, ता. पंढरपुर जि. सोलापूर याचे उघड्या खोली मध्ये एकुण ०१,४९,३४०/-रूचा प्रोव्ही माल त्यात १) १३,५००/-रू किंमतीचे ओल्ड बील एक्ट्रा स्पेशल वीस्की कंपनीचे ७५०मीलीचे १०८ प्लॅस्टीकच्या बाटल्या प्रत्येकी किंमत १२५/-रू त्यावर फक्त गोवा राज्य विक्रीसाठी असे लिहिलेले, २) ५०,१६०/-रू किंमतीचे रॉयल स्टॅग सुपरीर विस्की कंपीनीचे १८० मीलीचे ५२८ काचेच्या बाटल्या प्रत्येकी किंमत ९५ रूपये त्यावर फक्त गोवा राज्य विक्रीसाठी असे लिहलेले, ३) ३६,७२०/-रू किंमतीचे मॅकडॉल नं १ रिसीव्ह विस्की कंपनीचे १८० मीलीचे ४३२ काचेच्या बाटल्या प्रत्येकी किंमत ८५ रू त्यावर फक्त गोवा राज्य विक्रीसाठी असे लिहलेले, ४) ४८,९६०/-रू किंमतीचे इंम्पेरीअल ब्ल्यु बेडेड ग्रीन वीस्की कंपनीचे १८० मीलीचे ५७६ काचेच्या बाटल्या प्रत्येकी किंमत ८५/-रूपये त्यावर फक्त गोवा राज्य विक्रीसाठी असे लिहिलेला माल मिळून आला.

         त्यानंतर सदर विदेशी कंपनीच्या फक्त गोवा राज्यासाठी विक्री करण्याचा दारू साठी पोलीस ठाणेस आणुन त्याबाबत पोकों शहाजी दत्तात्रय मंडले नेमणुक पंढरपुर शहर पोलीस ठाणे यांनी दिले फिर्यादीवरून पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ६६९/२०२४ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई),८०,८१,८३,१०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असुन सदरचा माल कोठून आणला व तो पुढे कोणास विक्री करणार आहे याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पंढरपुर शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

         सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री.डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री. विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. अशिष कांबळे, सपोफौ राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम, पोहे दादासाहेब माने, पोहे सुरज हेंबाडे, पोहे विठ्ठल विभुते, पोहे सिरमा गोडसे, पोहे नितीन पलुसकर, पोहे सचिन हॅबाडे, पोहे प्रसाद औटी, पोशि  शहाजी मंडले, पोशि  समाधान माने, पोकों  बजरंग बिचुकले, पोकॉ  निलेश कांबळे तसेच राज्य उत्पादन शुल्क सोलापूर ग्रामीण विभागाचे पोकों. विजय नवनाथ शेळके यांनी केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)