कलापिनी संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे संगीत कलेचे रोमांचकारी सादरीकरण

0
एक रंगमंच, ५१ विद्यार्थ्यांचे सादरीकरण 
 
          मंगळवेढा (प्रतिनिधी) - येथील अशोक कोळी व मनिषा महालकरी यांच्या संकल्पनेतील रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर येथे नवरात्रनिमित्त सुरू असलेल्या संगीत महोत्सवात पंढरपूर येथील कलापिनी संगीत विद्यालयाच्या ५१ विद्यार्थ्यांनी एकाच रंगमंचावर आपल्या संगीत कलेचे  रोमांचकारी व अंगावर शहारे आणनारे सादरीकरण केले.
          सुप्रसिद्ध तबला वादक व संगीत शिक्षक विकास पाटील व प्रियंका पाटील यांच्या संकल्पनेत साकार असलेली “तबला अभंग” हि संकल्पना मंगळवेढा वाशीयांना खूप भावली. वारकरी संप्रदयाच्या नियमानुसार पंचपदी व तदनंतर ओंकार स्वरुपा, कानडा राजा पंढरीचा, अभिर गुलाल या अभंगांवर सर्व विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. ३५ तबला वादक व १६ गायक अशा सर्वांनी हा कार्यक्रम सादर केला. यावेळी मोठ्या प्रमाणात श्रोता वर्गही उपस्थित होता.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)