स्वेरीचे प्रा. करण पाटील यांना पीएच. डी. पदवी प्राप्त

0
‘मॅनेजमेंट स्टडीज' या क्षेत्रातील व्यवसायांना मिळणार नवीन दिशा 

         पंढरपूर (प्रतिनिधी) - गोपाळपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंतर्गत असलेल्या एमबीए विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा. करण बाबासो पाटील यांनी पुण्यातील भारती विद्यापीठातून 'अ स्टडी ऑफ प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ प्रायव्हेट शुगर इंडस्ट्री इन सोलापूर डिस्ट्रीक्ट्र' या विषयावर शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च असणारी पीएच. डी. पदवी संपादन केली असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
          स्वेरीच्या प्रा. करण बाबासो पाटील यांना भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत असलेल्या अभिजित कदम इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स, विजापूर रोड, सोलापूर मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. अकबरसाहेब बी. नदाफ यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. करण पाटील स्वेरीच्या एम.बी.ए विभागात गेल्या १० वर्षांपासुन प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ज्ञानदानाबरोबरच डॉ. करण पाटील हे स्वेरीचे प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता तसेच वसतिगृहाचे चीफ रेक्टर म्हणून काम पाहतात. इंग्रजी व मराठी भाषेवर त्यांचे उत्तम प्रभुत्व असल्यामुळे त्यांच्या कार्यातून काम करण्याची विशेष कसब दिसून येते. डॉ. करण पाटील यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा जवळपास ६ परिषदांमध्ये सहभाग घेवून आपले संशोधनपर पेपर्स सादर केले आहेत  तसेच वेगवेगळ्या जर्नल्समध्ये त्यांनी एकूण १४ रिसर्च पेपर्स प्रकाशित केले आहेत. त्यांच्या या संशोधनामुळे ‘मॅनेजमेंट स्टडीज' या क्षेत्रातील व्यवसायांना नवीन दिशा मिळणार आहे. डॉ. पाटील यांना अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स, विजापूर रोड सोलापूरचे संचालक डॉ. एस.बी. सावंत, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्यासह इतर प्राध्यापकांचे सहकार्य लाभले आहे. प्रा. करण पाटील यांनी पीएच. डी. प्राप्त केल्याबद्धल त्यांचा स्वेरीतर्फे महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाचे माजी संचालक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी सदस्य त्याचबरोबर, स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एन. बी. पासलकर यांच्या हस्ते डीआरडीओ तथा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (संरक्षण, संशोधन आणि विकास संघटना) चे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.अशोक नगरकर, बी.ए.आर.सी.चे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ.व्ही के सुरी, डॉ.विजय कुलकर्णी, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी. डी.रोंगे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, विश्वस्त व पदाधिकारी, अभियांत्रिकी पदवीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणिवार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस. व्ही. मांडवे, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्धल डॉ. करण पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)