'कर्मयोगी' बनणार “एज्युकेश्नल हब”

0
कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता.

            पंढरपूर (प्रतिनिधी) - शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर या संस्थेच्या कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला  शासनाकडून  नुकतीच मान्यता मिळाली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी बी फार्मसी व डी फार्मसी ला प्रवेश घेऊ शकतात. बी फार्मसी व डी फार्मसी ला प्रवेश घेण्यासाठी १६३४७  हा इन्स्टिटयूट कोड वापरावा लागणार आहे. 
 
          सध्या फार्मसी कंपन्यांमध्ये फार्मासिस्टला मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल बी फार्म, डी फार्म करण्याकडे दिवसेंदिवस वाढत आहे. याचाच विचार करून संस्थेने बी फार्म व डी फार्म हे दोन्ही कोर्स विद्यार्थ्यांसाठी चालू केले आहेत. यासाठी इन्स्टिट्यूट मध्ये सुसज्ज लॅब, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक प्रशस्त क्लासरूम, वैद्यकीय सुविधा, सुसज्ज कम्प्युटर लॅब, अत्याधुनिक टेस्टिंग इन्स्ट्रुमेंट व मशीन्स उपलब्ध आहेत तसेच मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. या मान्यतेमुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 

        श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यावेळी म्हणाले की, कर्मयोगी संकुल मध्ये सध्या प्ले ग्रुप, ज्युनिअर केजी, सिनीयर केजी, प्रायमरी स्कूल,  हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज डिप्लोमा व डिग्री अभियांत्रिकी कॉलेज, नर्सिंग कॉलेज इ कोर्सेस उपलब्ध आहेत. आता बी फार्मसी व डी फार्मसी या कोर्सेस ला मान्यता मिळाली आहे. तालुक्यातील विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी बाहेर जायला लागू नये म्हणून भविष्यामद्धे विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कॉलेज काढण्याचाही मानस आहे असे ही त्यांनी संगितले. 
 
         यावेळी कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. गणेश वाळके यांनी बी  व डी फार्मसीला प्रवेश घेऊन विद्यार्थ्यानी उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)