एक्सपो 2024 चे उद्-घाटनप्रसंगी आद्य वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. कराळे यांचे प्रतिपादन
पंढरीतील 'एकाच छताखाली दिवाळीची खरेदी'ला जोरदार प्रतिसाद
पंढरपूर / (प्रतिनिधी) - पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील अनेक गोरगरीब गरजू लोकांच्या मदतीसह महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण करण्याचे काम मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे करीत आहेत. महिलाकडूनही आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला जावा म्हणून प्रयत्न करीत असतात. त्यामुळे आपल्याला सर्वाना नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या दिलीपबापू धोत्रे यांना आता आपण आमदार करूया. असे आवाहन आद्य वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्शा डॉ.शोभा कराळे यांनी केले आहे.
पंढरीत टिळक स्मारक मैदानावर .
दिवाळीची खरेदी एकाच छताखाली होत असून येणाऱ्या दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक्सपो 2024 चे उदघाटन प्रसंगी डॉ. कराळे यांनी वरील आवाहन केले आहे. यावेळी
मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते वरील कार्यक्रमचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक मोहम्मद उस्ताद, शशिकांत पाटील, अनिल बागल, अप्पा करचे, बाबा चव्हाण, गणेश पिंपळनेरकर, सागर कांबळे इत्यादी उपस्थित होते.
असंख्य महिला आपले गृहोपयोगी वस्तू तयार करून आपले कुटुंब चालवत असतात.अशा गरजू महिलांना आर्थिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून यंदाच्या दिपावलीच्या निमित्ताने पंढरपूर येथील टिळक स्मारक मंदिर येथे आद्य वीरशैव महिला मंडळ व मनसे ॲग्रो इंडस्ट्री लि.यांच्या संयुक्त विद्यमानाने दिपावलीच्या निमित्ताने खाद्यपदार्थाचे व अन्य दिवाळीनिमित्त आकाश कंदील, फराळ सामान, पणती, मेणबत्त्या, हस्तकलेच्या वस्तू वीजेची उपकरणे,आदी महिलांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी या ठिकाणी स्टॉल वर ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती आद्य वीरशैव महिला मंडळ यांच्या अध्यक्षा डॉ.कराळेताई यांनी या एक्सपोच्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना त्यांनी दिली.
मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी महिलांना एकप्रकारे प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. दिलिपबापू धोत्रे यांचे सहकार्य लाभले आहे.या ठिकाणी असलेल्या स्टॉल भाडे आकारले नाही.आणि दोन दिवस चालणाऱ्या या एक्सपो आता चार दिवस चालू रहाणार आहे. या बाबतीत मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी सहकार्य केले आहे.
सर्वसामान्य जनतेसाठी एक सामान्य कुटुंबातील युवक अथकपणे धडपडत आहे.अशा दिलीप बापू धोत्रे यांना लोकप्रतिनिधी म्हणून संधी द्यावी अशी अपेक्षा डॉ.कराळेताई यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनीही आपल्या भाषणात आपण केलेल्या कार्याला उजाळा दिला. कायम गरजवंताना साथ देत राहणार असल्याचेही धोत्रे यांनी यावेळी सांगितले. महिलांच्या या व्यवसाय वाढीसाठी आपण कायम सहकार्य करणार असल्याचे आश्वासनही दिलीपबापू धोत्रे यांनी यावेळी दिले आहे.
यावेळी पत्रकार हरिभाऊ प्रक्षाळे यांनीही दिलीपबापू धोत्रे यांच्या चांगल्या कामाला उजाळा दिला. या उद्घाटन प्रसंगी सौ. माधुरी दिलीप धोत्रे, यांचे सह आद्य वीरशैव महिला मंडळाच्या महिलासह विविध मान्यवर उपस्थित होते.