शिव स्वराज्य यात्रेत नागेश फाटे यांचा विशेष सन्मान

0
शरदचंद्र पवार  यांच्या उस्थितीत पक्षाच्या शिव स्वराज्य यात्रेचा सांगता समारंभ

             पंढरपूर (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या शिव स्वराज्य यात्रेत पायाला भिंगरी बांधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याबरोबर फिरत व्यापार व उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले. वेळप्रसंगी पक्षाची बाजू, भूमिका ठामपणे मांडण्याची जबाबदारी पार पाडली. विधानसभा निवडणुकीतही दिलेली जबाबदारी पार पाडावी म्हणून याची दखल घेवून पक्षाच्यावतीने सन्मान चिन्ह देवून विशेष गौरव करण्यात आला. 
      इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या शिव स्वराज्य यात्रेचा सांगता समारंभ देशाचे नेते शरदचंद्र पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उस्थितीत संपन्न झाला. यावेळी खा.डॉ. अमोल कोल्हे, खा.धैर्यशील मोहिते पाटील, खा.निलेश लंके, सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, मा.मंत्री बाळासाहेब पाटील, आम.सुमनताई पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष महिबुब शेख, विद्यार्थी संघटना प्रदेशाध्यक्ष सुनील  गव्हाणे, सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख पंडीत कांबळे, मा.आ. राजु आवळे, उत्तमराव जानकर, मा.आ, नारायण आबा, अनिल सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, युवकचे प्रदेश सरचिटणीस अरूण आसबे, सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब जाधव, राष्ट्रवादी उद्योग व व्यापारी विभागाचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय काळे प्रमुख उपस्थितीत होते.         
           याप्रसंगी शिवस्वराज्य यात्रेत ९ आॕगस्ट २०२४ ते १६ आॕक्टोबर २०२४ या कालावधीत २४ दिवस ७३६५ कि.मी.चा प्रवास करीत तब्बल १९ जिल्ह्यात शिव स्वराज्य यात्रेत  सहभागी झाले.शरद पवार यांचे विचार, पक्षाची भुमिका जनतेपर्यंत पोहचविल्या. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने उद्योग व व्यापार विभागाचे राज्य प्रमुख नागेश फाटे गौरवचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.  
             नागेश फाटे यांनी आता पर्यंत पक्षाच्या  उद्योग व व्यापार विभागात राज्य प्रमुख पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अत्यंत चोखपणे पार पाडत फाटे यांनी उद्योग व व्यापार विभाग संपूर्ण राज्यात वाढविण्याचे काम केले आहे. या कामाची दाखल घेवून सन्मान करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)