स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मॉक पार्लमेंट’ संपन्न

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाचाच एक भाग म्हणून लोकसभेचे कामकाज कसे चालते? यावर सूक्ष्मपणे अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘मॉक पार्लमेंट’ चे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध राजकीय व्यक्तिमत्वांच्या छबी हुबेहूब साकारल्या होत्या.
        स्वेरीतील इंटरनल क्वालिटी अशुरन्स सेलचे समन्वयक डॉ.एस.एस.वांगीकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच राजकीय घडामोडींचे ज्ञान असले पाहिजे व यातूनच सर्वांगीण विकास, नेतृत्व, संवाद, टीमवर्क, या बाबींच्या विकासाला हातभार लागतो.’ विद्यार्थ्यांना सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत व एकंदरीत राज्य व्यवस्थेबाबत माहिती असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. स्वाती पवार यांच्या  नेतृत्वाखाली आयकॉनच्या समन्वयक प्रा. कांचन चव्हाण यांच्या सहकार्याने स्वेरीत ‘मॉक पार्लमेंट’चे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या हुबेहूब भूमिका साकारताना स्वेरीतील विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण, बोलण्याची लकब, वेशभूषा, हावभाव आदी बाबींचे उत्तम प्रदर्शन घडवले.  स्पर्धा परीक्षांमध्ये राजकीय प्रश्न हमखास विचारले जातात हाच धागा पकडून विद्यार्थ्यांनी अभ्यासाचाच एक भाग म्हणून या ‘मॉक पार्लमेंट’चे आयोजन केले होते.
        यामध्ये अच्छे दिन, अर्थ संकल्प, स्त्री सबलीकरण, बेरोजगारी, रस्ते नूतनीकरण व विकास, जीएसटी, व जातीय जनगणना अशा विविध विषयांवर राजकीय भाष्य करताना विद्यार्थी राजकीय नेत्यांमधील समतोलपणा अत्यंत खुबीने राखत होते. या ‘मॉक पार्लमेंट’ मध्ये कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. यामध्ये सभागृह अध्यक्ष ओम बिर्ला यांची भूमिका सोनाली करवीर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका ओम गाढवे यांनी केली. त्याच प्रमाणे विद्यार्थी व त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा पुढील प्रमाणे आहेत- सिमून तांबोळी (अर्थमंत्री-निर्मला सीतारामन), संदेश रितपुरे (गृहमंत्री-अमित शहा), अथर्व माळवदे (खा.राहुल गांधी).समर्थ मोटे (रामदास आठवले), वैकुंठी जाधव (डिंपल यादव), श्रेया जगताप (शांभवी चौधरी), माधवी स्वामी (अनुराधा पटेल), सौंदर्या कलशेट्टी (कंगना राणावत), ऐश्वर्या घोगरदरे (प्रणिती शिंदे), श्रीप्रिया कारंडे (स्मृती इराणी), पायल खरात (वर्ष गायकवाड), तन्वी पाटील (प्रिया सरोज), सरस्वती शिंदे (बासुरी स्वराज), सुहास नागणे (अभिषेक बॅनर्जी), अजिंक्य सुरवसे (राजनाथ सिंह), निखिल देवकर (मल्लिकार्जुन खर्गे), रत्नमाला पांढरे (महुवा मित्रा), पियुष शिंदे (अनुराग ठाकूर), प्रतिक भालके (अखिलेश यादव), शिवानी दानवे (सयोनी घोष),  रितू जाधव (सुप्रिया सुळे), समृद्धी भोसले (नवनीत राणा), श्रावणी दिंडोरे (प्रिन्सेस ऑफ जॉर्डन) आदींनी काम पाहिले. यामध्ये प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी देखील उपस्थित होते. दत्तात्रय अहेरवाडी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)