लिंक रोड मार्गे पंढरपूर-पुणे बस धावणार- ग्राहक पंचायत

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) - पुण्याकडे जाणाऱ्या बसेस लिंक रोड मार्गे धावणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. 
            राज्य परिवहन महामंडळाच्या  पंढरपूर आगारात प्रवासी राजा दिन हा उपक्रम सोलापूर विभाग नियंत्रक श्री. अमोल गोंजारी यांचे प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. यामध्ये ग्राहक पंचायतीने  पंढरपूर-पुणे-पंढरपूर या बसेस लिंक रोडवरुन ये जा कराव्यात अशी मागणी केली. त्याप्रमाणे  कार्यवाही करण्याचे मान्य करून त्याचे नियोजन लवकरच जाहीर करण्यात येईल असे विभाग नियंत्रकांनी सांगितले. श्री. अमोल गोंजारी यांनी विभाग नियंत्रक म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेबद्दल ग्राहक पंचायतीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमात ग्राहक पंचायतीचे सोलापूर जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हा सदस्य पांडुरंग अल्लापूरकर, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी पंढरपूर आगाराची पंढरपूर-  बारामती या मार्गावर सकाळी बससेवा सुरू करावी, पंढरपूर-मुंबई बस सुस्थितीतील असावी, पंढरपूर जिल्हा न्यायालय येथील मंजूर बस थांब्यावर प्रवासी चढ-उतार करण्यात यावेत, तेथे अधिकृत फलक लावण्यात यावा, पंढरपूर आगाराला नविन बसेस तातडीने मिळाव्यात, बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे, बस गाड्यांमध्ये आगार प्रमुखांचे मोबाईल नंबर लावावेत, डीजी लॉकरमधील कागदपत्रे पुरावे म्हणून सवलतीसाठी ग्राह्य येतील असे फलक विविध ठिकाणी  लावण्यात यावेत, स्थानकावरील पोलीस कक्षात कर्मचारी उपस्थित असावेत, त्याचबरोबर संपर्कासाठी फोन लिहावेत, फलाटाच्या दोन्ही बाजूला स्वच्छतागृहाची सोय तातडीने करावी, चार्जिंग स्टेशनचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे इत्यादी
प्रवाशांच्या मागण्या, अडचणी, समस्या मांडण्यात आल्या. त्या सोडविण्याचा गांभीर्याने विचार केला जाईल असा विश्वास विभाग नियंत्रक श्री. अमोल गोंजारी यांनी दिला.
           यावेळी उपस्थित पंढरपूर आगार प्रमुख योगेश लिंगायत, स्थानक प्रमुख अंकुश सरगर यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. वरीलप्रमाणे प्रवाशांच्या अडचणी समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील अशी अपेक्षा प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, जिल्हा संघटक दीपक इरकल  यांनी व्यक्त केली. या उपक्रमासाठी समाधान मेटकरी व सुमित भिंगे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)