महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवणार - अनिल सावंतांचा शब्द

0
तुमची आणि माझी व्यथा एकच, ..

 मंगळवेढा (प्रतिनिधी) - तालुक्यातील पाटखळ याठिकाणी सिद्धापूर मंगल कार्यालयात खेळ पैठणीचा कार्यक्रम, 11 ऑक्टोंबर 2024 ला पार पडला. भैरवनाथ शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल दादा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

             मंगळवेढा तालुक्यामध्ये हा चौथा खेळ पैठणीचा कार्यक्रम होता. यापूर्वी मंगळवेढा तालुक्यामध्ये एकूण तीन वेळा पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचा वाढता प्रतिसाद आणि महिलांच्या आग्रहामुळे पुन्हा एकदा मंगळवेढा तालुक्यात पैठणी कार्यक्रमाचे आयोजन अनिल सावंत यांनी केले. 

          खेळ पैठणी या कार्यक्रमाची सुरुवात अनिल सावंत आणि पत्नी शैलजा सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.  दीप प्रज्वलन केल्यानंतर, अनिल सावंत यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.
         आपल्या भाषणामध्ये अनिल सावंत म्हणाले, मंगळवेढ्याशी माझं विशेष नातं आहे. मंगळवेढ्याने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. तुमचा वाढत्या प्रतिसादामुळे मी पैठणी कार्यक्रमाचे आयोजन केलंय. मी माळरानावर कारखाना उभा केला आहे. तुमची आणि माझी व्यथा एकच आहे, आपल्याला पाणी नाही. मी केवळ निवडणुका आल्यात म्हणून तुमच्याशी संवाद साधतो आहे, असं नाही. येणाऱ्या काळात मी पाण्याचा प्रश्न निश्चित सोडवणार आहे. उमेदवारी मिळो अथवा न मिळो, मी पंढरपूर-मंगळवेढा जनतेसाठी भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून काम करत राहणार आहे. पवार साहेबांकडे मी उमेदवारी मागितली आहे. मला उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. येणाऱ्या विधानसभेला तुम्ही मला संधी द्या, या संधीचे मी सोने करीन. अशी विनंती करत अनिल सावंतांनी उपस्थित महिलांना आश्वासनही दिले.

         या कार्यक्रमाला साडेपाच हजाराहून अधिक महिलांची उपस्थिती होती. उपस्थित प्रत्येक महिलेस अनिल सावंत यांच्या हस्ते साडीचे वाटप करण्यात आले.

अनिल सावंत यांचे स्वागत-

         अनिल सावंत व्यासपीठावर जात असताना महिलांनी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. महिलांनी केलेले स्वागत लक्षणीय होतं.

महिलांच्या प्रतिक्रिया -

           पैठणी या कार्यक्रमाविषयी आणि अनिल दादांविषयी उपस्थित महिलांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. यामध्ये काही महिलांनी अनिल दादा आमचा भाऊ असल्याचं म्हंटले. वैयक्तिक काम असलं तरी अनिल दादा आमची दखल घेतात. आम्ही आमच्या भावाला विधानसभेमध्ये पाठवणारच अशा भावना व्यक्त केल्या. 

          अनिल दादा खेळ पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करत असल्यामुळे, आम्हाला एक दिवस आमच्या कलागुणांना सादर करण्याची संधी मिळते. हक्काचं व्यासपीठ मिळतं. कार्यक्रम खूप छान होता, फराळाचीही व्यवस्था होती. दादा आमदार झाले तर आम्हाला खूप आनंद होईल, अशाही काही प्रतिक्रिया होत्या. 

          मंगळवेढा आणि पाटखळ मधील विविध पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. खेळ पैठणी या कार्यक्रमाच्या निवेदकाची जबाबदारी भारत मुढे यांनी पार पाडली. 

           खेळ पैठणी या कार्यक्रमात बिस्किट खाणे तळ्यात मळ्यात, कावळा उड, चिमणी उड, डान्स, भुगा फोडणे इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. 

           अनिल सावंत आणि पत्नी शैलेजा सावंत यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

           विजेत्या स्पर्धकांच्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. अनिल दादांनी दिलेली पैठणी नेसून दादांना मतदान करायला जाणार असल्याचं अनेक विजेत्या महिला स्पर्धकांनी सांगितले.

बक्षीस वितरण - 

1) मनीषा मुंगसे, तळसंगी (led TV)
2) अनुराधा वाघमारे,  मारापुर (फ्रीज)
3) सुभद्रा पाटील, तळसंगी (वॉशिंग मशीन)
4) रचल मुंगसे, तळसंगी, (पिठाची चक्की)
5) अनिता मुंगसे, तळसंगी( शिलाई मशिन)

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)