पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील सो. क्ष. कासार समाजाच्यावतीने श्रीकालिका देवी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या नवराञोत्सवात दररोज श्रीसूक्त पठण, रांगोळी स्पर्धा, लहान मुलांच्या गेम, संगीत खुर्ची, महिलांचा नवदुर्गा कार्यक्रम, खेळ रंगला पैठणीचा व दांडीया, यज्ञ यागादी अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अभय भिवरे व अध्यक्ष विजय मोहोळकर यांनी दिली.
नवदुर्गा कार्यक्रमात साक्षी वाडेकर, देवकी सासवडे, प्राची मंगरूळे, पल्लवी कोकीळ, प्रियंका गाडे, स्नेहल गाडे, श्रध्दा वेळापूरे, राधा मोहोळकर, प्रतिक्षा येवनकर यांनी नवदुर्गैची विविध रूपे साकार केली. खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमात प्रथम क्रमांक पैठणी शितल होरणे, व्दितीय सोन्याची नथ प्रतिक्षा येवनकर व तृतीय भेट वस्तू प्रियंका येवनकर हे विजेते ठरले. बक्षिसांचे प्रायोजक विजय मोहोळकर, महेश भिवरे, अमित मांगले होते.
सर्व कार्यक्रमांमध्ये कालिका युवा परिवाराचे अक्षय वाडेकर, ऋषिकेश रोकडे, हर्षल तिवाटणे, मुकुंदा रोकडे, ओंकार मांगले, आदित्य काटकर, सम्मेद मुत्तीन, पुनम मांगले, पुजा डोंगरे, प्रतिक्षा वेळापूरे, तेजश्री सासवडे, साक्षी वाडेकर, मयूरी विभुते आदींनी परिश्रम घेतले.