मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे गादेगाव येथील सभेत आवाहन
हजारो नागरिकांची उपस्थिती
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांची पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील आयोजित केलेल्या गावभेट दौऱ्याप्रसंगी पंढरपूर, मंगळवेढा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मनसेला विजयी करा असे आवाहन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, महिला उपस्तित होते.यावेळी पंढरपूर,मंगळवेढा परिसरातील ज्येष्ठ नेते मंडळी तसेच मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, या राज्यात शेतकरी, कामगार, महिला भगिनी, तरुण युवक अडचणीत आहे. शेतकरी संकटात असून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसून विमा कंपन्यानी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. महिलांच्या हाताला काम नाही, तरुणांच्या हाताला काम नसून बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. गोरगरीब जनतेला घरकुल मिळत नसून, स्वस्त धान्य दुकानातून गरीब जनतेला धान्य मिळत नाही. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधिनी काहीही काम केले नाही. शेतकरी, सामान्य नागरिक, महिला तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी गावातील विविध प्रलंबित विकास कामे लवकरच पूर्ण करण्यासाठी मनसेला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या गाव भेट दौऱ्यास नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत त्यांचे विविध ठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.