वसंतराव काळे आय.टी.आय.च्या प्रशिक्षणार्थीचे सोलापूर जिल्ह्यामध्ये घवघवीत यश

0
वसंतराव काळे आय.टी.आय.च्या प्रशिक्षणार्थी शासकीय व खाजगी आय.टी.आय मधून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम ,द्वितीय ,तृतीय ,
तिन्ही क्रमांक संपादन

        पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वीजतंत्री या व्यवसाय ट्रेड मधील प्रशिक्षणार्थी यांनी सन 2023-24 अखिल भारतीय व्यावसाय परीक्षेत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक संपादन केला. यामध्ये शुभम रामचंद्र मोरे ,वीजतंत्र ट्रेड  यांनी 98% गुणसंपादन करून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तर जयदीप नितीन पवार वीजतंत्री या ट्रेड मधील प्रशिक्षणार्थ्यांनी 97. 67% मार्क संपादन करून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. व तृतीय क्रमांक वरद विलास शिंदे ,वीजतंत्री या ट्रेड मधील प्रशिक्षणार्थी त्यांनी 97.5% गुण संपादन केले आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये शासकीय व खाजगी आय.टी.आय मधून वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वीजतंत्री या व्यवसाय ट्रेड मधील प्रशिक्षणार्थीनी प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीनही क्रमांक संपादन करून घवघवीत यश मिळवले आहे. या प्रशिक्षणार्थ्यांना निदेशक विक्रम पिसे सर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
         या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. कल्याणरावजी काळेसाहेब यांच्या शुभहस्ते प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आय.टी.आय.चे प्राचार्य मा.संतोष गुळवे सर, रणजित जगताप,   निदेशक विक्रम पिसे सर , अनिल ननवरे सर, अमोल आयरे सर, संतोष सुरवसे सर, अनिल जाधव सर उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)