माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत प्रवेशद्वाराचे भूमिपूजन
पंढरपूर (प्रतिनिधी) - लक्ष्मी टाकळी येथे गेल्या पंचवार्षिक मध्ये अनेक विकासाची कामे महेश नाना साठे व सरपंच संजय साठे यांच्या माध्यमातून झाले आहेत. गावाच्या विकासाचा ध्येय घेतलेले सरपंच व उपसरपंच लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीला लाभल्यामुळे अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत तर अनेक कामे चालू आहेत. यावेळी बोलताना संजय साठे म्हणाले, या भागात मी लहानाचा मोठा झाल्यामुळे येथील सर्व वसाहती मधील अनेक अडचणी मला माहित आहेत. त्या मी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मला या भागातील नागरिकांनकडून अनेक सूचना मिळत असतात त्या सूचनाचा मी अभ्यास करून त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या लक्ष्मी टाकळी गावाचे प्रवेश द्वार व्हावे अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा होती व तशी माझी ही इच्छा होती आपल्या गावाचे प्रवेशद्वार खूप चांगले असावे असे मलाही वाटत होते ते आज पूर्णत्वास नेण्यासाठी मी प्रयत्न केले व त्यास आज यश आले त्याचाच आज उद्घाटन समारंभ आहे
लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत प्रवेशद्वाराचे भूमिपूजन कार्यक्रम माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाटन सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य व संपर्कप्रमुख सोलापूर लोकसभा महेश साठे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे यांच्या हस्ते व टाकळी गावचे सरपंच संजय साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याचबरोबर ग्रामपंचायत हद्दीतील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यास महेश नाना साठे यांच्या जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या २५ लाख रुपयेच्या रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच सागर सोनवणे, माजी सरपंच नंदकुमार वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य नागरबाई साठे, आशाबाई देवकते, औदुंबर ढोणे, रोहिणी साठे, रेश्मा साठे, रूपालीताई कारंडे, माजी सरपंच विजयमाला वाळके, माजी उपसरपंच महादेव पवार, ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे, आबासाहेब पवार, विकास देवकते, भारत जाधव, महादेव काशीद, विठ्ठल ढोणे, नाना मोरे, बंडू थोपटे, सागर कारंडे, रोहन बचुटे, सौरभ नागटिळक, विनायक वर्पे, सोनू चव्हाण, बापू उकरांडे, गणेश ढोणे, अंकुश ढोणे, अनिल सोनवणे, सविता पवार मॅडम, सुनिता जाधव, प्रियंका कवडे, उषा गाडगे, काजल खरे, सुरेश टिकुरे, सचिन वाळके, टाकळी ग्रामपंचायत मधील सर्व ग्रामपंचायत आजी-माजी सरपंच ग्रामपंचायत आज-माजी सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळी, युवा वर्ग या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.