कर्मयोगी श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्त "शरीरसौष्ठव आणि व्यायाम" मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
पंढरपूर (प्रतिनिधी) - कर्मयोगी कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्त शरीरसौष्ठव आणि व्यायाम" मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, पंढरपूर येथे करण्यात आले असल्याची माहिती भाजपा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा प्रभारी अक्षय वाडकर यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते, मार्गदर्शक नामांकित पुरस्कार विजेते मिस्टर आशिया, मिस्टर इंडिया ३ वेळा,व मानाचा एकलव्य पुरस्कार विजेते बाॅडी बिल्डर सुनील आपटेकर हे
व्यायामाचे महत्त्व आणि व्यायामाचे फायदे यावर मार्गदर्शन करणार आहेत.
नव युवकांना शरीर सौष्ठवतेची तसेच व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी तसेच तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे त्यापासून दूर व्हावेत व सदृढ शरीर व मन बनवावेत यासाठी खास व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
हे व्याख्यान दि.१५ ऑक्टोबर २०२४ सकाळी १० वाजता होणार आहे. तरी सर्वांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्रणव परिचारक युवा मंच, पंढरपूर-मंगळवेढा व श्री पांडुरंग परिवार युवक आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.