आ.यशवंत तात्या माने यांच्या गावभेट दौऱ्यास मतदाराचा उस्फूर्त प्रतिसाद

0
पंढरपूर तालुक्यात आज व उद्या दौरा

         पंढरपूर (प्रतिनिधी) - मोहोळ राखीव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) उमेदवार आ. यशवंत माने यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे मतदार संघातून आपला गावभेट सुरु ठेवला आहे. उत्तर सोलापूर भागातील आपला दौरा आटपून आज रविवार दि. 27ऑक्टॉबर पासून सोमवार दि.28 या दोन दिवसात पंढरपूर तालुक्यातील सर्व गावात गावभेट दौरा सुरु ठेवला आहे. या दौऱ्या दरम्यान आ. माने यांना मतदाराचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
          यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मी मतदार संघातील गावोगावी  जावून, आपण मागील पंचवार्षिक मधून केलेल्या कोठ्यावधी रुपयेच्या  विकास कामाची पावती म्हणून अजून एकदा मला संधी द्यावी. तसेच मतदार संघात विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून महायुतीचा सरकारच्या माध्यमातून भरपूर निधी उपलब्ध करून घेतला असून बरीच कामे पूर्ण तर काही कामे चालू असुन राहिलेल्या कामाला सुरुवात लवकरच सुरू होणार आहे तर काही विकास कामे पूर्ण करण्यासाठी व मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेची सेवा, सुविधा उपलब्ध देण्यासाठी मी आपणास विनंतीपूर्वक पुन्हा एकदा मला संधी द्यावी असे आवाहन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आणि यासाठीच मी आपल्याकडे आलो असल्याचे सांगितले.
          आ. यशवंत माने यांनी मागील पंचवार्षिक मधून गावोगावी विकास निधी दिला आहे. कोणत्याही गावच्या राजकारणात कसलाही सहभाग नोंदविला नव्हता. यामुळेच आ. माने हे सर्वसमावेशक उमेदवार म्हणून आपलेसे वाटत आहेत.तर प्रत्येक गावातील जनतेला हा विकास दिसत आहे. यामुळेच आ.माने यांना अजून एकदा संधी मिळालेली दिसत आहे.
        मौजे कोंढारकी (ता.पंढरपूर)येथे आमदार यशवंत (तात्या) माने यांनी गावभेट दौऱ्या दरम्यान नागरिकांशी संवाद साधला. यावेळी रमाकांत नाना पाटील, अतुल मोरे, रयत क्रांती पक्ष जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण बोबडे, सागर निर्मळ सर, तारापूर सोसायटी व्हाईस चेअरमन प्रदीप कदम, मोहन मोरे, विजय सरतापे, संजय नागणे, उपसरपंच अनिल दांडगे माजी सरपंच महादेव पाटील, बाजीराव माने, पांडुरंग काकडे, राम पाटील, अज्ञान दांडगे, सदाशिव नागणे, पंडित शिखरे, भारत दांडगे, दिगंबर दांडगे, पांडुरंग पाटील, कुंडलिक थिटे सह महिला भगिनींसह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



आ. यशवंत माने यांनी तालुक्यातील विविध गावात दौरा सुरू केला आहे. यामध्ये रविवारी कोंढारकी, चळे, आंबे, सरकोली, ओझेवाडी, नेपतगाव,आंबेचिंचोली,या गावात भेटी आहेत.
 
उद्या सोमवारी पुळुज, पूळुजवाडी, शंकरराव - नळी, विटे, पोहोरगाव, खरसोळी, तारापूर, मगरवाडी, फुलचिंचोली या गावातून गावभेट दौरा आयोजित करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)